(Image Credit: Boldsky)
पुरुषांची त्वचा ही शेविंग केल्यावर फार रखरखीत होते. तसेच थंडीच्या दिवसातही त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या जाणवायला लागतात. अशात त्वचा मुलायम ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला ३ फेशिअल सांगणार आहोत. या फेशिअलमध्ये नैसर्गिक तत्वांचा वापर केला जातो. त्यामुळे त्वचेला यापासून काहीही नुकसान होत नाही.
ओटमील फेस पॅक
जर त्वचा फार कोरडी किंवा रखरखीत असेल तर ओटमील फेसपॅक तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. हा फेसपॅक दोन प्रकारे त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करतो.
साहित्य
१ कप ओटमील पावडर
३ चमचे कोमट पाणी
१ चमचा मध
१ चमच अंड्याचा पांढरा भाग
१ चमचा दही
कसा बनवाल फेसपॅक?
- एका भांड्यात या वस्तू चांगल्या मिश्रित करा.
- हा फेसमास्क अर्ध्या तासांसाठी लावा.
- फेसपॅक सुकल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा
- नंतर टॉवेलने हलक्या हाताने चेहरा कोरडा करा, याने चेहऱ्याचा ड्रायनेस दूर होईल.
स्ट्रॉबेरी फेसपॅक
हा फेसपॅक चेहऱ्यावर रंगत आणण्यासोबतच त्वचेची ताठरता आणि एजिंग मार्क कमी करतो. जर तुमची त्वचा ऑयली असेल तर याने ही समस्याही दूर होते.
साहित्य
८ ते १० स्मॅश केलेल्या स्ट्रॉबेरीज
१ चमचा ऑलिव ऑईल
१ चमचा मध
कसा कराल तयार
- एका भांड्यात वरील गोष्टी चांगल्याप्रकारे एकत्र करा.
- चेहरा पाण्याने धुवून हे मिश्रण लावा.
- हा फेसपॅक चेहऱ्यावर २५ मिनिटांसाठी लावून ठेवा.
- याने त्वचेवरील अतिरिक्त तेल दूर होईल आणि चेहरा आणखी उजळेल.
मुलतानी माती फेसपॅक
त्वचेवर ताजेपणा हवा असेल आणि मृत त्वचा दूर करायची असेल तर मुलतानी मातीचा फेसपॅक फार फायदेशीर आहे. या फेसपॅकने त्वचेच्या पोर्समध्ये साचलेली घाण दूर होते आणि चेहरा चमकदार दिसतो.
साहित्य
२ चमचे मुलतानी माती
२ चमचे कोरफडीचा गर
१ अंड्याचा पिवळा भाग
कसा कराल तयार
- वरील गोष्टी एका भांड्यात मिश्रित करा.
- हा फेसपॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा.
- त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा.
- याने मृत त्वचा दूर होईल आणि त्वचा स्वच्छ होईल.