शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

केसांना तेल लावायचं नसेल तर मजबूत आणि चमकदार केसांसाठी ४ खास उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 11:38 AM

हेअर ऑइलबाबत वेगवेगळे प्रश्न लोकांच्या मनात राहतात. कोणतं हेअर ऑइल कोणत्या वेळी लावायचं? मजबूत केसांसाठी कोणतं हेअर ऑइल लावावं?

(Image Credit : FirstCry Parentin)

हेअर ऑइलबाबत वेगवेगळे प्रश्न लोकांच्या मनात राहतात. कोणतं हेअर ऑइल कोणत्या वेळी लावायचं? मजबूत केसांसाठी कोणतं हेअर ऑइल लावावं? कोंडा जावा म्हणून कोणतं हेअर ऑइल वापरावं? असे कितीतरी प्रश्न अनेकांना पडत राहतात. केसांच्या पोषणासाठी हेअर ऑइल फार महत्त्वाचं असतं. चला जाणून घेऊ हेअर ऑइलचं महत्त्व आणि काही वैज्ञानिक तथ्य....

हेअर ऑइल का असतं खास

हेअर ऑइलमुळे केसांना चमक येते आणि प्रत्येकालाच केसांना चमक हवी असते. पण काही लोकांना केसांना तेल लावणं आवडत नाही. कोही लोकांना ऑफिसमध्ये किंवा पार्टीमध्ये केसांना तेल लावून जाणं पसंत नसतं. जर तुम्हीही असंच करत असाल तर तुम्हाला तुमच्या केसांची चिंता वाटली पाहिजे. कारण तेल लावलं नाही तर केसांवर काही दिवसातच वाईट परिणाम बघायला मिळेल.

(Image Credit : Naturally Daily)

आज आम्ही तुम्हाला केसांना तेल न लावल्याने होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्याचे काही खास उपाय सांगणार आहोत. हे उपाय नैसर्गिक पद्धतीने केसांना पोषण देतात आणि केसांना नवी चमक प्रदान करतात. चला जाणून घेऊ असेच काही खास घरगुती उपाय....

पपई आणि बेसन

हा हेअर मास्क तयार करण्यासाठी पपईचे छोटे छोटे तुकडे करून त्यात बेसन आणि अ‍ॅपल व्हिनेगर टाकून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट अर्ध्या तासांसाठी केसांना लावा. याने तुम्हाला चमकदार आणि डॅंड्रफ फ्री केस मिळतील.

हेअर ऑइल नाही तर दही लावा

(Image Credit : Lifestylica)

जर तुम्हाला केसांना तेल लावायचं नसेल तर केसांना पोषण देण्यासाठी तुम्ही केस धुण्याआधी डोक्याच्या त्वचेवर दही लावा आणि अर्ध्या तासाने केस शॅम्पूने धुवावे. याने तुम्हाला नंतर कंडीशनिंग करण्याचीही गरज पडणार नाही.

लिंबाचा रस आणि केळं

(Image Credit : Organic Facts)

हा उपाय करण्यासाठी एक पिकलेलं केळं स्मॅश करून त्यात २ चमचे लिंबाचा रस मिश्रित करा. नंतर केसांना हे मिश्रण २० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर केस शॅम्पूने चांगले स्वच्छ करा.

अंडी आणि कच्च दूध

(Image Credit : KXRB 1140 AM/100.1 FM)

अंड कच्च्या दुधात मिश्रित करुन घट्टा होईपर्यंत फेटा. ही पेस्ट नंतर १ तासांपर्यंत केसांना लावून ठेवा. नंतर केस शॅम्पूने धुवावे. याने केस चमकदार होतील.

ग्लिसरीन आणि अ‍ॅलोवेरा जेल

जर तुमच्या केसांना दोन तोंड असण्याची समस्या असेल तर अंड्याचा पिवळ्या भागात ३ चमचे ग्लिसरीन आणि १ चमचा अ‍ॅलोवेरा जेल चांगल्याप्रकारे मिश्रित करा. ही पेस्ट केसांना अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर शॅम्पूने केस धुवावे.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स