(Image Credit : FirstCry Parenting)
डार्क सर्कल म्हणजेच डोळ्यांखाली येणारे काळे डाग महिलांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरत असतात. हा डार्क सर्कल होण्याच्या काही कारणांमध्ये झोप कमी होणे आणि तणाव ही दोन मुख्य कारणे आहेत. तर आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असणे हेही आहे. शरीरात हार्मोन्सचं संतुलन बिघडल्यावर डार्क सर्कल होतात.
या डार्क सर्कलपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात वेगवेगळी ब्यूटी प्रॉडक्ट्स अशतात. पण आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे होणारी ही समस्या केवळ काही वेळेसाठीच दूर होते. ही समस्या नेहमीसाठी दूर करायची असेल तर आहारावर आणि सवयींवर लक्ष द्यायला हवं. शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता झाली की, त्वचेवर त्याचा प्रभाव बघायला मिळतो. त्यामुळे डार्क सर्कल दूर करण्यासाठी कोणते व्हिटॅमिन्स उपयुक्त आहेत हे जाणून घेऊ....
व्हिटॅमिन A
हे व्हिटॅमिन अॅंटी-ऑक्सिडेंट आहे. जे अॅंटी एजिंग व्हिटॅमिनसारखं काम करतं. याने डार्क सर्कलसोबतच त्वचेवरील सुरकुत्यांपासूनही सुटका मिळते. हे व्हिटॅमिन लोणी, पपई, कलिंगड आणि आंब्यामध्ये अधिक प्रमाणात आढळतं.
व्हिटॅमिन C
हे व्हिटॅमिन डार्क सर्कलपासून सुटका मिळवण्यासाठी फार फायदेशीर आहे. याने रक्तवाहिन्या मजबूत होतात, ज्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा निरोगी राहते. व्हिटॅमिन सी आंबट फळांसोबतच बटाटे, टोमॅटो, फ्लॉवर, ब्रोकलीमध्येही आढळतं.
व्हिटॅमिन E
व्हिटॅमिन E च्या कमतरतेमुळेही डार्क सर्कलची समस्या होते. हे व्हिटॅमिन कमी झाल्यास त्वचेची चमकही कमी होऊ लागते. हे व्हिटॅमिन सूर्यफूलाचं तेल, सूर्यफूलाच्या बीया, पालक, ब्रोकली, शेंगदाणे आणि बदाममध्ये आढळतं.
व्हिटॅमिन K
त्वचेच्या सौंदर्यासाठी व्हिटॅमिन K फार गरजेचं असतं. शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता झाली तर डोळ्यांच्या आजूबाजूची केपेलेरिस डॅमेज होऊ लागतात. ज्याकारणाने डार्क सर्कल होतात. हे टाळण्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन K चा आहारात समावेश करावा लागेल. हे व्हिटॅमिन पालेभाज्या, पालक, फ्लॉवर, ब्रोकलीस, मांस यात आढळतं.