दररोजचा थकवा आणि धूळ मातीमुळे कोरडी झालेली त्वचा निस्तेज दिसू लागते. अशातच आपण आपल्या त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. जेणेकरून पुढच्या दिवशी तुम्हाला पुन्हा निरोगी आणि उजळलेली त्वचा मिळण्यास मदत होइल. सकाळच्या वेळी तुम्ही त्वचेच्या उत्तम काळजी घेतली तरिही रात्री झोपण्यापूर्वी आपण अनेकदा काही चुका करतो. ज्या त्वचेचं आरोग्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. याबाबत तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, रात्री जर त्वचेची काळजी घेतली नाही तर ते घातक ठरू शकतं. यामुळे त्वचेवर वेळेआधीच वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी आपल्या त्वचेकडे अजिबात दुर्लक्षं करू नका. आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही त्वचेचं सौंदर्य वाढू शकता.
1. दिवसभराची धावपळ आणि धूळ मातीमुळे चेहऱ्याच्या त्वचेचं सौंदर्य नष्ट होतं. त्यामुळे तुम्ही कितीही थकला असाल तरिही झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप काढण्यास विसरू नका. चेहऱ्यावर मेकअप लावून झोपल्यामुळे त्वचेवर केमिकल रिअॅक्शन होण्याचा धोका असतो. यामुळे अनेक त्वचेच्या समस्या उद्भवतात. जसं खाज किंवा अॅलर्जी यांसारख्या समस्याही होऊ शकतात. तसेच यामुळे त्वचेवरील रोमछिद्र बंद होतात. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेपर्यंत शुद्ध हवा पोहोचू शकत नाही. यामुळे त्वचा श्वास घेऊ शकत नाही आणि कोरडी होते.
2. जर तुम्ही बऱ्याच काळापासून फेशिअल केलं नसेल आणि त्यामुळे त्वचा निस्तेज दिसत असेल तर दररोज रात्री चेहऱ्यावर मसाज करून झोपा. मसाज केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्वचा उजळण्यास मदत होते. प्रयत्न करा की, फेशिअल करण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचाच वापर करा. यामुळे साइड इफेक्टचा धोका कमी होतो.
3. झोपण्यापूर्वी हलक्या कोमट पाण्याने आंघोळ करा. त्यामुळे दिवसभराचा थकवा दूर होइल आणि तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होइल. तुम्ही पाण्यामध्ये थोडं मीठ एकत्र करून आंघोळ करू शकता. मीठामधील तत्व त्वचेचं संक्रमण होण्यापासून वाचवतात. शांत झोपही लागते.
4. जर तुम्हाला निरोगी आणि लांब केस पाहिजे असतील तर दररोज झोपण्यापूर्वी केस विंचरून मगच झोपा. असं केल्याने स्काल्पला ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि केसांची मुळं मजबुत होतात.
5. दिवसभाराच्या धावपळीमुळे डोळ्यांना थकवा जाणवतो. त्यामुळे जेव्हा तुम्हा झोपायला जाणार त्याआधी डोळे स्वच्छ आणि थंड पाण्याने धुवून घ्या. असं केल्याने डोळे स्वच्छ राहतील आणि डार्क सर्कल्स होण्याचा धोकाही कमी होइल.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)