आपले डोळे आणि डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा फार नाजूक असते. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सुरकुत्यांपासून सुटका करून घ्यायची असेल तर अजिबात चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचारांबाबत सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही अगदी सहज डोळ्यांखालील सुरकुत्या कमी करू शकता.
एरंडेल तेल
एरंडे तेलाचा वापर करून डोळ्यांखालील सुरकुत्या कमी करणं सहज शक्य होतं. एरंडेल तेल म्हणजेच कॅस्टर ऑइल दररोज झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली लावा. त्यामुळे काही दिवसांतच डोळ्यांखालील सूज आणि सुरकुत्या दूर होतील.
रोजहिप ऑइल
अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री या तेलाचा वापर करतात. रोजहिप ऑइलमध्ये अॅन्टी-एजिंग प्रॉपर्टिज असतात. याचा वापर करून तुम्ही अगदी सहज डोळ्यांखालील सुरकुत्या दूर करू शकता. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असते. त्यांनाही या तेलाचा वापर करणं फायदेशीर ठरतं.
पपई
पपईमध्ये ब्रोमिलेन नावाचं एंजाइम असतं. ज्यामध्ये अॅन्टी-इन्फेमेटरी गुणधर्म असतात. जे आपल्या त्वचेला हायड्रोसी अॅसिड देतं. पपईचा वापर करून आपण अगदी सहज डोळ्यांखालील सुरकुत्या दूर करू शकतो. तुम्ही गरज असेल तर पपईचा रस डोळ्यांखाली लावू शकता. 15 मिनिटांसाठी ठेवून त्यानंतर धुवून टाका. असं केल्याने तुम्ही अगदी सहज त्यापासून सुटका करू शकता.
खोबऱ्याचं तेल
खोबऱ्याचं तेल आरोग्यासोबतच त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर ठरतं. जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांखाली खोबऱ्याचं तेल लावता. त्यावेळी डोळ्यांखाली त्वचा मॉयश्चराइझ होते. त्याचा वापर करून तुम्ही डोळ्यांखालील सुरकुत्या दूर करू शकता.
अवोकाडो
अवोकाडो आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यामध्ये चांगले फॅट्स असतात. ज्यामुळे डोळ्यांखाली सुरकुत्या दूर करण्यासाठी मदत होते. त्यासाठी एक पिकलेलं अवोकाडो घेऊन त्याचा पल्प काढून घ्या. त्यानंतर आपल्या हातांना स्मॅश करून डोळ्यांखाली लावा. 15 ते 20 मिनिटं तसचं राहू द्या आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ करा.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)