हिवाळा सुरू झाल्यानंतर त्वचा तसेच चेहऱ्याशी निगडीत अनेक समस्या उद्भवतात. या समस्या दूर करण्यासाठी बऱ्याचदा स्त्रीया महागड्या उत्पादनांना प्राधान्य देतात. त्यात मोठ्या प्रमाणावर केमिकल्स असतात.आणि त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.चेहऱ्यावर सुरकुत्या येणे. चेहरा काळा पडणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो .हिवाळ्यात आकर्षक त्वचा मिळवण्यासाठी काही घरगुती नैसर्गीक उपायांचा वापर करून त्वचेचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते.त्यासाठी वाचा या काही खास टिप्स.
१)हिवाळ्यात त्वचा शुष्क आणि कोरडी होते.त्वचेचा मुलायमपणा कायम ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.मॉईश्चरायजर लावा आणि फेस मसाज किंवा फेशियल करा.जेणेकरून त्वचा उजळण्यास मदत होईल. थंडीत त्वचेची जितकी जास्त काळजी घ्याल तितकी त्वचा सुंदर राहिल.
२)त्वचेची निगा राखण्यासाठी ऋतूप्रमाणे आपल्या सवयी बदलणे आवश्यक असते. ऋतूनुसार चेहऱ्याची क्रिम, मॉईश्चरायजर, बॉडी लोशन ,यांचा वापर करावा.विटामीन ई च्या तेलाचा वापर करावा.
३) हिवाळ्यात केस शुष्क होतात. केसांची योग्य ती काळजी घेतली नाही तर केसात कोंडा होतो. घाम आणि धुळींमुळे केसांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो.अशावेळी तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ती हेअर ट्रिटमेंट घेणे आवश्यक आहे.केस रोज धुवा ,केसांना मसाज करा.
४) नखांची विशेष काळजी घ्या. बॉडीलोशनसाठी कोको बटर शीया बटर यांचा वापर करा.कमीतकमी १० ग्लास पाणि प्या .रोजच्या आपारात फळांचा तसेच फळांचा रस यांचा समावेश करा.
५) ऋतू बदलल्यानंतर त्वचेत बरेच बदल होऊ लागतात.त्यामुळे चेहरा कोरडा प़डणे, सुरकूत्या पडणे ,अशा समस्या उद्भवतात.यापासून वाचण्यासाठी नियमीत फेशियल करा. फेशियल करताना सेनोफोरेसिस चा वापर करा. यात विटामीन सी आणि लॅक्टिक अॅसिडचा वापर केला जातो, अल्ट्रावॉयलेट रेजमुळे त्वचाकाळी पडण्याची दाट शक्यता असते.