सर्वचजण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय ट्राय करतात. कधी घरगुती उपायांनी तर कधी बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्टसचा वापर करून आपल्या त्वचेची काळजी घेण्यात येते. पण सध्याचं बदलतं वातावरण आणि हवेतील प्रदुषण यांमुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. मग यापासून सुटका करून घेण्यासाठी पार्लर ट्रिटमेंट किंवा त्वचेच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यात येतो. पण बऱ्याचदा या केमिकलरहित ट्रिटमेंटमुळे त्वचेच्या समस्या दूर होण्याऐवजी आणखी वाढतात. कधीकधी तर यामुळे साइड इफेक्ट्स होतात. जाणून घेऊयात असे काही घरगुती उपाय ज्यांमुळे तुम्ही त्वचेच्या समस्यांपासून सुटका करून घेऊ शकता...
जर चेहऱ्याचं सौंदर्य आणखी वाढवायचं असेल तर घरी तयार करण्यात आलेला हा स्क्रब पॅक चेहऱ्याची त्वचा स्वच्छ करण्यासाठी सर्वात फायदेशीर उपाय आहे. यामुळे त्वचेवरील प्रदुषण कमी होते तसेच त्वचेला पोषणही मिळते. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते.
असा करा वापर
हे स्क्रब वापरण्यासाठी एका बाउलमध्ये एक चमचा लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये साखर, थोडं ऑलिव्ह ऑईल टाका. ऑलिव्ह ऑईलऐवजी बदामाचं तेलही वापरू शकता. हे मिश्रण एकत्र करून शरीरावर अथवा चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने मसाज करा. साधारणतः 10 ते 15 मिनिटं ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. चेहऱ्यावरील त्वचा मुलायम आणि तजेलदार होईल.
हातापायांची त्वचा मुलायम आणि सुंदर करण्यासाठी हा सर्वात फायदेशीर उपाय आहे. यामुळे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकून त्याजागी नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात. तसेच यामुळे त्वचेवरील प्रदूषण निघून जाऊन त्वचा स्वच्छ होण्यासही मदत होते. याव्यतिरिक्त त्वचा निर्जीव झाली असेल तर ती तजेलदार करण्यासाठी हे स्क्रब मदत करतं. यासोबत जर ऑलिव्ह ऑईल किंवा व्हिटॅमिन ई मिक्स केलं तर तुमच्या वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठीही हे फायदेशीर ठरतं.
असा करा वापर
एका बाउलमध्ये अर्धा कप कॉफी घ्या. त्यामध्ये एक चमचा साखर टाकून मि्क्स करा. त्यामध्ये व्हिटॅमिन ई किंवा ऑलिव्ह ऑईल मिक्स करून पेस्ट तयार करा. चेहऱ्यासह शरीराच्या त्वचेवर हे मिश्रण लावा.
तांदळाच्या पीठामध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. त्वचेच्या सुरकुत्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच यामध्ये त्वचा स्वच्छ करून त्वचेचा रंग उजळवण्याचे गुणही असतात. याव्यतिरिक्त हा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याला ठंडावा मिळतो.
असा करा वापर
हे स्क्रब तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये दोन मोठे चमचे दही घ्या. त्यामध्ये तांदळांच पीठ, एक चमचा मध आणि बदामाचं तेल घालून मिश्रण करा. आंघोळीच्या साधारण एक तास अगोदर हे मिश्रण चेहऱ्यावर आणि कोपराच्या त्वचेवर लावा. 10 ते 15 मिनिटं ठेवल्यानंतर पाण्याने धुवून टाका.
केळ्यामध्ये पोषक तत्वांसोबत अनेक व्हिटॅमिन्सही आढळतात. जे त्वचेवरील वाढत्या वयाची लक्षणं थांबवून त्वचेला सुंदर आणि तरूण बनवतात. याव्यतीरिक्त चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासही मदत होते.
असा करा वापर
एका बाउलमध्ये केळी आणि साखर एकत्र करून घ्या. त्यामध्ये बदामाच्या तेलाचे काही थेंब टाका. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर अवयवांवर लावा. हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. चेहऱ्याची त्वचा मुलायम आणि तजेलदार दिसेल.
दलिया आणि दही यांपासून तयार करण्यात आलेला स्क्रब पॅक त्वचेवरील प्रदूषण आणि घाण साफ करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त त्वचेवरील बॅक्टेरिया स्वच्छ करण्यासाठीही मदत होते.
असा करा वापर
एका बाउलमध्ये 8 मोठे चमचे दलिया घ्या. त्यामध्ये 1 चमचा सफरचंदाचं व्हिनेगर मिक्स करून त्यामध्ये बदामचं तेल आणि मध मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने मालिश करा. यामले त्वचेला उजाळा मिळतो आणि त्वचा तजेलदार दिसते.
टिप : वरील स्क्रबचा वापर तज्ज्ञांच्या सल्लाने करा. कारण स्क्रब तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पदार्थांची काही जणांना अॅलर्जी असण्याची शक्यता असते.