वाढत्या वयात डोक्यावरच्या केसांसोबत दाढीचे केसही पांढरे होत जातात. दाढीमुळे पुरूषांच्या चेहऱ्याला हॅण्डसम लुक येतो. जास्तीत जास्त लोक पार्लरला जाण्यापेक्षा घरच्याघरी केस काळे करतात. विशेष म्हणजे अनेकदा खर्च वाचवून घरच्याघरी दाढीचे केस काळे केल्याने साईड इफेक्ट्सचा सामना करावा लागतो. लूकसुद्धा बिघडण्याची शक्यता असते. हेअर डायमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात. या केमिकल्समुळे त्वचेला नुकसान पोहोचू शकतं. म्हणून दाढीचे केस पांढरे झाल्यानंतर रंग लावताना सावधगिरी बाळगायला हवी.
नियमित दाढी केल्याने चांगली दाढी येते हा एक मोठा गैरसमज लोकांमध्ये असतो. जोपर्यंत गरज येत नाही तोपर्यंत दाढी करणे टाळले पाहीजे. कारण इन्ग्रोथ असलेले केस सतत काढल्यामुळे त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता असते. तसंच सतत टेंशनमध्ये राहणे हे सुद्धा दाढी न वाढण्याचे एक कारण आहे. म्हणून दाढीची व्यवस्थित वाढ होण्यासाठी ताण-तणावापासून लांब रहा.
तुरटी आणि गुलाबपाणी
दाढीला रंग लावण्यासाठी अनेकजण डीप ब्राऊन रंगाची निवड करतात. त्या केमिक्लसमुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. तुरटी आणि गुलाब पाणी यांची पेस्ट तयार करुन ती दाढीला लावा. त्यामुळे दाढी केस नैसर्गिक रंग प्राप्त करील. तुरटी बारीक करुन त्याची पावडर गुलाब पाण्यात मिळसून लावणे फायद्याचे असते.
मुग डाळ आणि गुलाबपाणी
अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये गुलाबपाण्याचा वापर केला जातो. गुलाबपाणी आणि मूग डाळ यांची पेस्ट करा. ती मिशी आणि दाढीला लावा. या पेस्टमुळे पांढरे केस हटण्यास मदत होते. मूगात एक्सफोलिएटिंग गुण असल्याकारणामुळे नको असलेले केस गळण्यास मदत होते. तसेच गुलाबपाणी त्वचा साफ करण्यास मदत करते शिवाय केस नष्ट करण्यास मदत होते. दोन्ही गोष्टी एकत्र केल्यामुळे याचा परिणाम पांढऱ्या केसांवर होते आणि ते नाहीसे होऊन त्वचा चमकदार दिसते.
पुदिन्याचा चहा
पुदीनाची चहा एक उत्तम उपाय आहे. जास्तीत जास्त पुदीनाची चहा घ्या. पुदीनामुळे मिशीच्या केसांना नैसर्गिक रंग प्राप्त होतो. यामुळे दाढी आणि मिशीचे केस पांढरे होण्यापासून सुटका होते. त्यामुळे वाढत्या वयातही तुम्ही म्हातारे झाल्याप्रमाणे दिसणार नाही. दाढीच्या केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी कोणत्याही घरगुती उपायांचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
वजन कमी करण्याच्या नादात 'या' चुका कराल; तर बारिक होणं कायमचं विसराल
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?, वेळीच माहीत करून घ्या