चेहऱ्याची सुंदरता वाढण्यासाठी प्रत्येक महिलेला सुंदर गुलाबी ओठ हवे असतात. पण अनेकांची इच्छा असूनही त्यांना हे मिळत नाही. सुंदर आणि गुलाबी ओठ मिळवण्यासाठी महिला वेगवेगळ्या कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर करतात. पण तरीही त्यांना जे हवं ते मिळत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी गुलाबी ओठ मिळवण्याचे काही खास घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.
- लिंबाचा रस रोज रात्री झोपण्याआधी आपल्या ओठांवर लावा. हा उपाय कमीत कमी दोन महिने करा.
- संत्र्य़ाची फोड तुमच्या ओठांवर चोळा. या रसामुळे ओठ मुलायम आणि टवटवीत होतात.
- नारळाचं पाणी, काकडीचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करुन ओठांवर लावल्याल काळेपणा दूर होतो.
- हळद पावडर मलाईमध्ये मिश्रित करुन ओठांवर लावल्यास ओठांचा काळेपणा दूर होतो.
- डाळिंबाचे दाणे मलाईमध्ये मिश्रित करुन ओठांवर लावा. काही दिवस हा उपाय करा.
- रोज झोपण्याआधी ग्लीसरीन, गुलाब जल आणि केसर मिश्रित करुन ओठांवर लावल्यास ओठ आकर्षक दिसतात.