(Image Credit : www.medicalnewstoday.com)
तुम्हाला माहीत आहे का की, बिअरने केस मुलायम आणि चमदार होतात? हे तर सर्वांनाच माहीत आहे की, अल्कोहोल आरोग्यासाठी किती नुकसानकारक आहे. पण बिअरमध्ये असलेल्या कमी प्रमाणातील अल्कोहोलमुळे तुम्ही केस सुंदर आणि आकर्षक करू शकता. फक्त यासाठी तुम्हाला बिअरने केस धुण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी.
धूळ, प्रदूषण आणि दमट वातावरणामुळे केस खराब तर होतातच सोबतच त्यांची चमकही दूर होते. त्यामुळे केसांची सतत काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरले जातात. पार्लरमध्ये शेकडो रूपये खर्च केले जातात. पण बिअरच्या मदतीने तुम्ही कमी खर्चात चांगले केस मिळवू शकता.
बिअरने केस धुणे फायदेशीर ठरतं कारण बिअर धान्यापासून तयार केली जाते. त्यामुळे यात व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन बी केसांना आणि डोक्याच्या त्वचेला पोषण देण्याचं काम करतात. तसेच यातील माल्टोज आणि ग्लूकोजमुळे केसांना मजबूती मिळते.
कसे धुवाल केस?
1) चांगल्या क्वालिटीची बिअर घ्या - बिअर खरेदी करताना ती चांगल्या क्वालिटीचीच खरेदी करावी. थोडे पैसे वाचवण्यासाठी क्वालिटीसोबत कॉम्प्रमाइज करू नका. बिअरच्या बॉटलवर एक्सपायरी डेटची चेक करा.
२) सामान्य तापमानावर ठेवा - बिअरने केस धुण्याच्या काही तासांपूर्वी बिअरची बॉटल फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा. जेव्हा बॉटल सामान्य होईल तेव्हाच वापरा. थंड बिअरचा वापर केसांवर करू नका.
३) केसांना करा शॅम्पू - केसांना आधी तुम्ही वापरत असलेल्या शॅम्पूने धुवा. पण चुकूनही कंडीशनर लावू नका. केसांना शॅम्पू करण्यासाठी बेबी शॅम्पूचा वापर सर्वात चांगला असतो.
४) बिअर डोक्यावर टाका - केसांच्या लांबीनुसार, केसांवर बिअर ओता. हलक्या हाताने डोक्याच्या त्वचेवर मालिश करा. पण जास्त वेळ मालिश कराल तर केसगळती होऊ शकते.
५) केस धुवा - आता केस पाण्याने चांगल्याप्रकारे धुवा. पण केसांवर हाताने फार जोरात घासू नका. असे केल्याने केसांचं नुकसान होईल.
६) कंडीशनरचा वापर - बिअर एक नैसर्गिक कंडीशनर आहे. पण जर तुम्हाला वाटत असेल की, बिअरचा वापर केल्यावरही तुम्हाला केस अधिक मुलायम हवे असतील तर तुम्ही कंडीशनरचा वापर करू शकता.