जशी जशी थंडीला काही प्रमाणात झाली आहे, तसतशी तुम्हाला त्वचेची चिंता सतावत असेल. तुम्हीही तुमच्या त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांबाबत चिंतेत असाल तर ही चिंता दूर करा. आम्ही तुमच्यासाठी काही होममेड फेसपॅक घेऊन आलो आहोत. हे फेसपॅक वापरुन तुमची त्वचा आणखी चमकदार आणि उजळलेली दिसेल.
गव्हाची साल
१०० ग्रॅम गव्हाच्या दाण्यांची साल एक कप पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. ही पेस्ट सकाळी चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. या त्वचेवरील मृत त्वचा दूर होईल आणि चेहऱ्यावर आणखी जास्त चमक येईल.
तांदळाच्या पीठापासून पेस्ट
तांदळाच्या पीठामध्ये अर्धा चमा मध टाका आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासाने गरम पाण्याने चेहरा धुवा आणि एखाद्या कोल्डक्रीमने चेहऱ्यावर हलक्या हाताने १० मिनिटे मसाज करा. याने त्वचेचा रखरखीतपणा दूर होतो आणि सुरकुत्याही कमी होतात.
हा उपायही बेस्ट
कॉर्न, ज्वारीचं पीठ आणि मलाई समान प्रमाणात एकत्र करुन पेस्ट तयार करा. जर हवं असेल तर यात काही थेंब गुलाबजलही टाकू शकता. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडी झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यानेही चेहऱ्यावरील मृत त्वचा दूर होते.
बदाम पेस्ट त्वचेसाठी फायदेशीर
बदाम गरम पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर त्याची साल काढा. बदाम सुकल्यावर त्याचं पावडर तयार करा. या पावडरमध्ये थोडं दूध मिश्रित करुन पेस्ट चेहऱ्यावर लावा. या पेस्टने चेहरा मुलायम होतो आणि त्वचेचा रखरखीतपणाही दूर होतो.
संत्र्याच्या सालीची पेस्ट
संत्र्यांची साल वाळवून त्याचं पावडर तयार करा. या पावडरमध्ये एक चमचा दूध, थोडी हळद आणि लिंबाचा रस टाका. जर चेहऱ्यावर पुरळ असेल तर वाळलेल्या कडूलिंबाच्या सालीचं पावडर तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळतो.
पीठ आणि द्राक्षांची पेस्ट
थोड्या पीठामध्ये थोडी द्राक्ष मिक्षित करा. हे मिश्रण चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या. तसेच क्रीमने हलक्या हाताने मसाज करा. याने त्वचा मुलायम होईल.
मध चेहऱ्यासाठी फायदेशीर
मधात थोडं दही आणि दूध मिश्रित करून चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. याने त्वचा चमकदार होईल.
चंदन पावडरचा फेसपॅक
चंदन पावडरमध्ये थोड मिल्स पावडर, मध, लिंबाचा रस आणि बदामाचं तेल मिश्रित करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. याने चेहरा उजळण्यास मदत होईल.