चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्येने अनेकजण सतत हैराण असतात. मग ते दूर करण्यासाठी किंवा लपवण्यासाठीही हवी ती धावपळ केली जाते. चेहऱ्यावर ज्याप्रकारे पिंपल्स येतात त्याचप्रमाणे पाठीवरील पिंपल्सनेही अनेकजण त्रासलेले असतात. अनेकडा पाठीवर पुरळ किंवा लहान फोडं येतात. याला बॅक्ने सुद्धा म्हटलं जातं. पण अनेकजण चेहऱ्याचे पिंपल्स दूर करण्यासाठी जितकी काळजी घेतात तितकी पाठीच्या पिंपल्ससाठी घेताना दिसत नाहीत. कारण पाठीवरचे पिंपल्स दिसत नाही हेही कारण असू शकतं.
पाठीवरचे पिंपल्स किंवा बॅक्ने घाम, धूळ, माती या कारणांनीही आणखी वाढू शकतात. पाठीची रोमछिद्रे चेहऱ्याच्या तुलनेत अधिक मोठे असतात. कधी कधी तर असं होतं की, पाठीवर पिंपल्स फार जास्त प्रमाणात येतात. ज्यांमधून पस निघतो, त्यांचे डागही त्वचेवर पडतात. पण आज आम्ही तुम्हाला पाठीवरील पिंपल्स दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
का होतात बॅक्ने?
आहारात पौष्टिक तत्वांची कमतरता
जास्त मसालेदार पदार्थ खाण्याची सवय
गर्भधारणेनंतर हार्मोन्समध्ये झालेले बदल
मासिक पाळीमुळे मानसिक तणाव होणे.
ट्राय करा हे घरगुती उपाय
१) दालचीनीचा वापर करुन तुम्ही पाठीवरचे पिंपल्स दूर करु शकता. याने पाठ स्वच्छ होते. दालचीनी पावडरमध्ये पुदीन्याचा रस किंवा कच्चं दूध मिश्रित करा आणि हे पूर्ण पाठीवर लावा. हा लेप सुकल्यानंतर पाठ थंड पाण्याने धुवा.
२) पाठीवरील पिंपल्सपासून सुटका हवी असेल तर कच्च्या दुधात जायफल मिश्रित करुन लेप तयार करा. हा लेर पूर्ण पाठीवर लावा. कमीत कमी दोन तासांनी पाठ थंड पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा करा.
३) पिंपल्सपासून आराम मिळवायचा असेल तर टाईट कपडे वापरणे टाळा. सैल कपडे वापरावे. बेडशीटचे कव्हर आठवड्यातून दोनदा आवर्जूव बदला. तसेच पाठीवर कमी झोपा.
४) शरीरात होणाऱ्या जास्तीत जास्त समस्या या खराब लाइफस्टाइल आणि डाएटच्या कारणाने होते. त्यामुळे तुमच्या आहारात फळे, भाज्या आणि ज्यूसचा अधिक समावेश केल्यास तुम्हाला फायदा होईल. तसेच दिवसातून किमान ८ ग्लास पाणी प्यावे.
५) बक्ने पाठीच्या त्वचेच्या छिद्रांमध्ये घाम आणि तेल जमा झाल्या कारणाने होतात. तेलकट त्वचेमुळे बॅक्ने आणखी वाढतात. त्यामुळे रोज स्क्रब केल्याने त्वचेवर साचलेला घाम आणि तेल निघून जाऊ शकता. याने पिंपल्स होण्याची शक्यता कमी असते.
६) हे पिंपल्स दूर करण्यासाठी गुलाबजल आणि मुलतानी मातीचा लेपही तुम्ही पाठीवर लावू शकता. तुम्हाला हवं तर या लेपामध्ये तुम्ही थोडं ग्लिसरीनही मिश्रित करु शकता. ही पेस्ट रात्री पाठीवर लावा आणि कोरडा झाल्यावर सकाळी आंघोळ करताना धुवा.
७) यावर आणखी एक उपाय म्हणजे कोरफड आणि टोमॅटोचा गर एकत्र करुन एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट पाठीवर लावा आणि अर्ध्या तासासाठी तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने पाठ स्वच्छ करा.