पतीच्या निधनानंतर पत्नीचा तणाव कमी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2016 5:31 PM
पतीच्या निधनानंतर पत्नीचा फार मोठा तणाव कमी होतो.
लग्न म्हणजे आयुष्यभर एकमेकाला साथ देण्याचे दुसरे नाव. परंतु एका रिसर्चमध्ये असे दिसून आले की, पतीच्या निधनानंतर पत्नीचा फार मोठा तणाव कमी होतो.वाचून धक्का बसेल; परंतु पती जिवंत असलेल्या विवाहित महिलांना विधवांपेक्षा जास्त स्ट्रेस असतो, असे हे संशोधन सांगते.अर्थातच हा सॅम्पल सर्व्हे आहे. तो जगभरात तंतोतंत लागू होईलच असे नाही. इटलीतील पडोवा विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अध्ययनात असे दिसून आले की, जिथे एकीकडे पत्नीच्या निधनानंतर पुरुषांवर नकारात्मक परिणाम होतात तिथे, पतीच्या निधनानंतर काही महिला मोकळा श्वास घेतात. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होते.दुसरीकडे मात्र पत्नीवर मोठ्या प्रमाणात विसंबून असल्यामुळे तिच्या निधनाने पुरुषाच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण होते.या सर्व्हेतील प्रमुख संशोधिका कॅटरिना ट्रेव्हिसन सांगतात की, पत्नीमुळे पुरुषांना खूप आधार मिळतो. घर-कुटुंबाची जबाबदारी संपूर्णपणे ती पेलते. परंतु असे करताना पत्नीवर खूप ताण येतो. तिचे मानसिक आणि शारीरिक श्रम खर्ची पडतात. कदाचित त्यामुळे पतीच्या निधनानंतर पत्नीवर असलेला भार कमी होतो आणि तिची स्ट्रेस लेव्हल घटते.