दिल्लीत प्रदूषणाचा स्तर एवढा वाढला आहे की, भारताची राजधानी असलेल्या या शहरात 'हेल्थ एमरजेन्सी' घोषित करण्यात आली आहे. प्रदूषणाचा परिणाम आपल्या आरोग्यासोबतच आपल्या त्वचेवरही होत असतो. प्रदूषणात धूळ, माती यांच्या संपर्कात आल्याने त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्या सुरुवातीला पाहायला साध्या वाटत असल्या तरिही नंतर त्या वाढतात.
वायू प्रदूषणामुळे होऊ शकतो एक्जिमा
एक्जिमा किंवा स्किन इरिटेशन, त्वचेला जळजळ होणं, खाज आणि रॅशेज यांसारख्या समस्या होतात. प्रदूषण वाढल्याने त्वचेला नुकसान होतं. सूर्याच्या यूव्ही किरणांच्या संपर्कात आल्याने त्वचेचं टेक्स्चर आणि आरोग्य बिघडतं. याव्यतिरिक्त धूळ आणि माती त्वचेचं आरोग्य बिघडवते.
कमी वयातच दिसू शकता म्हातारे
विविध संशोधनांमधून असं दिसून आलं आहे की, ज्या व्यक्ती अशा शहरांमध्ये राहतात, जिथे वायु प्रदूषण अधिक असतं. त्या कमी वयातच म्हाताऱ्या दिसू लागतात. चेहऱ्यावर एजिंगचे निशाण जसं डार्क सर्कल्स, डार्क स्पॉट्स आणि रिंकल्स दिसू लागतात. धूळ आणि मातीमुळे त्वचेचे पोर्स हंद होतात. यामुळे त्वचेवर पूरळ, पिंपल्स, पिंगमेंटेशन आणि डलनेस दिसू लागतो.
ड्रायनेस वाढवतं प्रदूषण
त्वचेचा कोरडेपणा वाढण्याचं एक कारण प्रदूषण आहे. प्रदूषित हवा त्वचेचा ओलावा कमी करते. ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो. प्रदूषण आणि ड्रायनेसमुळे त्वचेची इलास्टिसिटी कमी होते. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसतात आणि चेहऱ्याचा ग्लो नष्ट होतो.
कोंडा आणि शुष्क केस
शरीराच्या त्वचेसोबत डोक्याची त्वचा किंवा स्काल्पवरही प्रदूषणाचा परिणाम होतो. हवेसोबत केमिकल्स आणि धूळ माती, डोक्याच्या त्वचेचे पोर्स आणि केस चिपचिपित होतात. त्यामुळे स्काल्पला खाज येते.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)