अॅलोवेरा म्हणजेच कोरफडीचे वेगवेगळे फायदे तुम्हाला माहीत असतीलच. पण अनेकांना असं वाटतं, कोरफड फक्त त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. मात्र याचा उपयोग केवळ त्वचेसाठी नाही तर वजन कमी करण्यासाठीही होतो. हे फार कमी लोकांना माहीत आहे की, कोरफडीचं जेल आणि ज्यूस वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय मानले जातात.
कोरफडीमध्ये मल्टी व्हिटॅमिन, एंजाइम, कार्बोहायड्रेट, अमीनो अॅसिड, सेलिसिलीक अॅसिड आणि दुसरेही अनेकप्रकारचे पोषक तत्वे म्हणजेच न्यूट्रिएंट्स आढळतात. ही पोषक तत्वे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. अॅलोवेरा जेल तुम्ही पाण्यासोबत, ज्यूसच्या रुपात सेवन करु शकता. तज्ज्ञांनुसार, नियमीतपणे अॅलोवेरा ज्यूस सेवन केल्यास तुमचा जाडेपणा कमी होईल आणि याने वेगवेगळे आजार दूर होण्यासही मदत होईल. कारण अॅलोवेरा ज्यूस प्यायल्याने शरीराला व्हिटॅमिन ए, बी१, बी२, सी, ई, फॉलिक अॅसिड इत्यादी गोष्टी मिळतात.
लवकर वजन करण्यासाठी अॅलोवेगाचा ज्यूस फार प्रभावी मानला जातो. याने पचनक्रिया सुधारण्यासोबतच वजन कमी होते. अॅलोवेरामुळे शरीराचं मेटाबॉलिज्म स्तरही वाढतो. सोबतच याच्या मदतीने शरीरात नैसर्गिक अॅंटी-ऑक्सिडेंट्सची निर्मिती होते. तसेच या ज्यूसने शरीरातील टॉक्सिक एलिमेंटही बाहेर येण्यास मदत होते. चला जाणून घेऊ याचे फायदे आणि सेवन करण्याच्या पद्धती....
- दररोज अॅलोवेरा ज्यूसचं सेवन काहीही खाण्याआधी करा. हे सेवन केल्यावर अर्धा तास काहीही खाऊ नका.
- अॅलोवेरा जेल कोणत्याही फळांच्या ज्यूससोबत मिश्रित करुन तुम्ही घेऊ शकता.
- अॅलोवेरा जेल तुम्ही खाऊही शकता किंवा पाण्याच्या मदतीने घेऊ शकता.
- लिंबू पाण्यात अॅलोवेरा आणि थोड्या प्रमाणात मध मिश्रित करुनही सेवन केल्यास वजन कमी करु शकता.
- अॅलोवेरा आणि लिंबाचा रसाचाही तुम्ही वजन कमी करण्यासाठी फायदा करुन घेऊ शकता.
(टिप: प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची अंतर्गत रचना ही वेगवेगळी असते. त्यामुळे काही लोकांना याची अॅलर्जीही असू शकते. त्यामुळे याचा वापर करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)