Alum Benefits for Skin In Winter : सुंदर, चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी लोक वेगवेगळी महागडी उत्पादने वापतात. पण या केमिकल युक्त उत्पादनांचे अनेक साइड इफेक्ट्सही असतात. आता हिवाळ्यात तर त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. या समस्या दूर करून त्वचा मुलायम आणि चमकदार करण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. यासाठी तुरटीचा वापर कसा करावा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुरटी फार आधीपासून आपल्या औषधी गुणांसाठी वापरली जाते. तुरटी हे एक नॅचरल खनिज आहे. ज्याचा वापर त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो.
त्वचेला तुरटीचे फायदे
टाचांच्या भेगा दूर होतात
हिवाळ्यात अनेकांच्या टाचांना भेगा पडतात. जर यांची वेळीच काळजी घेतली नाही तर त्यातून रक्तही येतं आणि चालणं अवघड होतं. अशात तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. यासाठी थोडं पाणी गरम करा. त्यात थोडी तुरटी टाका. यात थोडं खोबऱ्याचं तेल टाका. हे मिश्रण टाचांच्या भेगांवर लावा. काही दिवस हा उपाय कराल तर फरक दिसेल.
पिंपल्स होतील दूर
तुरटीमध्ये अॅंटी-सेप्टिक गुण असतात, जे पिंपल्ससाठी कारणीभूत बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. याने त्वचेची रोमछिद्रे साफ राहतात आणि त्वचेवरील तेलकटपणाही कमी होतो, ज्यामुळे पिंपल्स कमी येतात.
त्वचा टाइट होते
तुरटी त्वचेला टाइट करण्यास मदत करते आणि सुरकुत्या कमी करते. याने त्वचेमध्ये कोलेजन उत्पादन वाढतं, ज्यामुळे त्वचा लवचिक होते.
त्वचा उजळते
तुरटीमध्ये नॅचरल ब्लीचिंग गुण असतात, जे त्वचेला उजळ बनवतात आणि त्वचेवरील डाग-पुरळ दूर करण्यास मदत करतात.
त्वचा शांत राहते
तुरटीमुळे त्वचा शांत राहते आणि जळजळ कमी होते. तसेच याने त्वचेवरील सूज कमी करण्यासही मदत मिळते.
कसा कराल वापर?
तुरटी आणि गुलाब जल फेस पॅक
- एक चचा तुरटी पावडर 2 चमचे गुलाब जलमध्ये मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटे तशीच ठेवा. नंतर चेहरा धुवून घ्या.
तुरटी आणि मुल्तानी माती
- एक चमचा तुरटी पावडर 2 चमचे मुल्तानी माती थोड्या पाण्यात मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटे सुकू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.
तुरटी आणि दही
1 चमचा तुरटी पावडर 2 चमचे दह्यात मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटे तशीच ठेवा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.
काय काळजी घ्याल?
तुरटीचा वापर करण्याआधी त्वचेवर पॅच लावून बघा. जर तुम्हाला तुरटीपासून एलर्जी असेल तर याचा वापर करू नये. तसेच ड्राय त्वचा असलेल्या लोकांनी तुरटीचा वापर करताना काळजी घ्यावी. कारण याने त्वचा आणखी कोरडी होऊ शकते. तुरटी डोळ्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका.