शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

कडूलिंबाचे हे आरोग्यादायी फायदे माहीत आहेत का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 3:38 PM

कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... पण कडूलिंबाचे अनेक फायदे आहेत जाणून घ्या खास १० टिप्स.

मुंबई: कडूलिंबाच्या पानांचा, फळांचा आणि झाडाच्या सालीचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. कडू असूनही पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... पण कडूलिंबाचे अनेक फायदे आहेत जाणून घ्या खास १० टिप्स.

1) त्वचा आणि केसांची काळजी घेत रक्त शुद्ध करण्याचं काम कडूलिंब करतं. यासाठी कडूलिंबाच्या सालाचा काढा बनवून प्यावा. जर हातापायाला खूप घाम येत असेल तर कडूलिंबाचं तेल उपयुक्त आहे. चेहऱ्यावर मुरुम झाल्यासही कडूलिंबाचं तेल उत्तम ठरतं. चेहऱ्यावर जुने डाग आणि उष्णतेनं पडलेले डाग जाण्यासाठी निंबोणीचं तेल लावावं. 

2) ताप आल्यास ,टायफाईड झाल्यास कडूलिंबाची २०-२५ पानं, २०-२५ काळी मिरे एका गठ्ठ्यात बांधून अर्धा किलो पाण्यात उकळून घ्यावं. पाणी उकळू द्यावे आणि झाकण लावून ठेवावं. पाणी थंड झाल्यावर चार भाग बनवून सकाळ-संध्याकाळ दोन दिवसांपर्यंत प्यावं.

3) कडूलिंबाची पानं बारीक करून दही आणि मुल्तानी मातीमध्ये मिसळून पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरी डाग काही दिवसांतच नाहीसे होतात. उन्हाळ्यात कडूलिंबाचा वापर त्वचेवरील मुरूम बरे करण्यास होतो.

4) खराब पाण्यामध्ये डास झाल्यानं आजारांचा गतीनं फैलाव होतो. यावरही कडूलिंब एक उपाय ठरतो. पाच लवंग. पाच मोठी विलायची,  महानीम बकायनची सींके शेकून त्यात ५० ग्राम पाणी मिसळून थोडं गरम करावं. ही एका वेळेची मात्रा आहे. असं दर दोन तासांनी बनवावं. सोबतच हाता-पायावर कडूलिंबाचं तेल लावून मालिश करावी. अशक्तपणा दूर होतो. जर कुणा रुग्णाला लघवी होत नसेल तर कडूलिंबाची पानं बारीक करून पेस्ट पोटावर लावावी, बरं वाटेल. 

5)  दातांच्या आरोग्यासाठी कडूलिंब उपयुक्त आहे. कडूलिंब, बबूलच्या काड्या दात स्वच्छ करायला वापरतात. शक्य असेल तर घरीच त्याचं मंजन बनवून घ्या. त्यात जळलेली सुपारी, जळलेल्या बदामचे साल, १०० ग्राम खडू, २० ग्राम बेहडा, थोडी मिरेपूड, ५ ग्राम लवंग, एक अर्धा ग्राम पेपरमिंट बारीक करून मंजन तयार करावं. या मंजनाच्या वापरानं दातांच्या सर्व समस्या दूर होतात. 

6) जर आपल्याला पोटाच्या समस्या असतील, पोट साफ होत नसेल तर निंबोणी खावी, पोट साफ होईल. रक्त स्वच्छ होईल आणि भूकही चांगली लागेल. 

7) डोळ्यांची जळजळ होत असेल किंवा मोती बिंदूचा त्रास होत असेल तर कडूलिंबाचं तेल डोळ्यात अंजनासारखं घालावं. 

8) जर पोटात किरम (किडे) झाले असतील तर पानांच्या रसात मध मिसळून चाटण घ्यावं कीडे मरतील. पाण्यात कडूलिंबाच्या तेलाची काही थेंब टाकून चहा सारखं प्यावं. लहान मुलाला ५ थेंब आणि मोठ्यांना ८ थेंबाहून अधिक घ्यावेत. 

9) कडूलिंबाचं तेल फॅटी अॅसिड आणि त्वचेत सहजपणे शोषून घेतलं जातं. त्यात व्हिटॅमिन ई असतं, ते त्वचेच्या पेशींमधील लवचिकता कायम ठेवतात. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स