सलाड म्हणून उपयोगी ठरणारी काकडी आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. काकडीचा गर त्वचेसाठी सर्वात फायदेशीर ठरतो. हा गर त्वचेवर लावल्याने त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. काकडीचं सर्वात मोठी क्वालिटी म्हणजे, यामध्ये नॅचरल वॉटर कन्टेट जास्त असतो. ज्यामुळे शरीरासोबतच त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत होते. असं केल्याने त्वचेवर नैसर्गिक उजाळा येतो.
कमी फॅट आणि कॅलरीजने भरपूर अशा या काकडीचे सेवन केल्यास अनेक आजार दूर होण्यास मदत होते. काकडीचे सेवन आपण बऱ्याच प्रकारे करु शकतो, जसे कोशिंबीर, ज्यूस, सॅँडवीच किंवा मीठ लावूनही सेवन करु शकता. काकडीमध्ये अनेक आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक गुणधर्म आहेत. अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्येही काकडीचा फ्रेशनेससाठी उपयोग करण्यात येतो.
काकडीचे त्वचेसाठी असणारे फायदे :
- त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी
- सन टॅनिंग दूर करण्यासाठी
- पफी आइज ठिक करण्यासाठी
- भाजलेली किंवा कापलेली जखम ठिक करण्यासाठी
- चेहऱ्याचे ओपन पोर्स ठिक करण्यासाठी
- डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी
- सुरकुत्या कमी करण्यासाठी
- डोळ्यांखालील लटकती त्वचा ठिक करण्यासाठी
- ब्लेमिशेस उत्तम ठेवण्यासाठी
- त्वचा मुलायम आणि ग्लोइंग करण्यासाठी
काकडीपासून स्किन टोनर तयार करा :
काकडीचा उपयोग दररोज केल्याने फ्रेश, सॉफ्ट आणि क्लिअर स्किन मिळवण्यास मदत होते. काकडीपासून टोनर तयार करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा :
- एक ताजी काकडी घ्या आणि तिची साल काढा.
- स्लाइसमध्ये कापून घ्या.
- मिक्सरमध्ये काकडीचे तुकडे आणि पाणी एकत्र करून बारिक करून घ्या.
- तयार पेस्ट गाळून घ्या आणि त्यामध्ये थोडा लिंबाचा रस एकत्र करा.
- एका छोट्या बाटलीमध्ये टाकून फ्रिजमध्ये ठेवा.
- जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर तिचा वापर करा.
- दररोज या स्प्रे बॉटलच्या मदतीने चेहऱ्यावर स्प्रे करा आणि फ्रेश लूक मिळवा.