सध्या वेगवेगळ्या कारणांनी अनेकांना कमी वयातच वृद्ध दिसण्याची समस्या होऊ लागली आहे. बरं ही समस्या महिलांपेक्षा पुरूषांमध्ये अधिक बघायला मिळते. याला वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यामुळे अनेकजण वेळेआधीच म्हातारे दिसतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही काही सोप्य टिप्स फॉलो करून तुमच्या त्वचेचं तारूण्य टिकवून ठेवू शकता. जाणून घेऊया त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी काही खास टिप्स...
सुर्यप्रकाशात जास्त वेळ राहू नका
त्वचेचं तारूण्य वाढविण्यासाठी किंवा वाढत्या वयातही तरूण दिसण्यासाठी आवश्यक आहे की, जेवढं शक्य असेल तेवढं सूर्याच्या प्रखर किरणांपासून दूर राहा. प्रखर सूर्यप्रकाशात सतत राहिल्याने त्वचेवर एज स्पॉट्स दिसून येतात आणि तुम्ही वयापेक्षा जास्त दिसून येता. परंतु, जर तुम्हाला कामामुळे उन्हामध्ये फिरावं लागत असेल तर सनस्क्रिन नक्की लावा. (Image Credit : https://www.themanual.com)
मॉयश्चरायझर ठरतं आवश्यक
ऑफिस किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाण्याची कितीही घाई असली तरिही तुम्ही मॉयश्चरायझर लावायला विसरू नका. मॉयश्चरायझर त्वचेचा कोरडेपणा दूर करून वाढत्या वयातही तुमच्या त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी मदत करतं.
जास्तीत जास्त पाणी प्या
वाढत्या वयातही तरूण दिसायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी प्या. तज्ज्ञांच्या मते, कमीत कमी 6 ते 8 ग्लास पाणी पिणं अत्यंत आवश्यक ठरतं. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.
धुम्रपान करणं टाळा
जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर आजपासूनच बंद करा. कारण धुम्रपान तुमच्या आरोग्यासोबतच तुमच्या त्वचेसाठीही घातक ठरतं. कारण धुम्रपान केल्यामुळे डोळे आणि तोंडाजवळ सुरकुत्या दिसू लागतात. तसेच स्किनवर रिंकल्सही दिसू लागतात.
झोप पूर्ण घ्या
अनेकदा कामाच्या प्रेशरमुळे पूर्ण झोप घेणं शक्य होत नाही. काही दिवांपूर्वीच करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, कमी झोप घेतल्याने फक्त आपल्या स्मरणशक्तीवर फरक पडत नाहीतर त्वचेचं तारूण्यही कमी होतं.
एक्सरसाइज आहे अत्यंत आवश्यक
जर तुम्ही कामाच्या व्यापामुळे स्वतःला वेळ देऊ शकत नसाल तर सकाळी किंवा संध्याकाळी कमीत कमी 10 मिनिटं तरी स्वतःसाठी द्या. यावेळेत एक्सरसाइज करा. यामुळे तुमच्या त्वचेसोबतच आरोग्यासाठीही अनेक फायदे होतील.
हेल्दी डाएट
त्वचेचं आरोग्य तुम्ही काय आहार घेता त्यावरही अवलंबू असतं. त्यामुळे आपल्या खाण्यामध्ये फ्रुट्स, फिस, हिरव्या पालेभाज्या आणि सलाड यांसारख्या हेल्दी पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुम्हाला त्वचेचं तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल.
ट्रेंड्स नाहीतर एजिंग स्टाइल करा मेन्टेन
लक्षात ठेवा, तुम्ही ट्रेन्डनुसार नाहीतर तुमच्या वयानुसार स्टाइल्स फॉलो करा. जर तुम्ही मिड-एज असाल तर अगदी कॉलेज गोइंग मुलांप्रमाणे ड्रेसिंग करू नका. आपली स्टाइल मेन्टेन करा. डिसेंट ड्रेसेसमुळे तुम्हाला डॅशिंग लूक कॅरी करायला मदत मिळेल.
बिअर्ड म्हणजेच दाढीची घ्या काळजी
आपण अनेकदा ऐकतो की, बिअर्डमुळे लूक आणखी क्लासी दिसतो. तुमच्या बिअर्डची स्टाइल तुमचं वय रिफ्लेक्ट करत असते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही एखादी नवीन स्टाइल कॅरी करणार असाल तर ती तुमच्यावर किती सुट करते हे नक्की लक्षात घ्या.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)