तुम्हाला हृदयविकार होण्याची शक्यता अवाजवी?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2016 1:54 PM
तुलनात्मक दृष्टीकोनातून विचार केला असता हार्ट अॅटॅक होण्याचा अंदाज वास्तविक धोक्यापेक्षा पाच ते सहा पट अधिक व्यक्त करण्यात येतो.
एखाद्या व्यक्तीला पुढील पाच वर्षांत हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता किती आहे याचा अंदाज बांधणाची पद्धती सदोष असून खऱ्या शक्यतेपेक्षा किती तरी पट अधिक शक्यता याद्वारे सांगण्यात येत असल्याचे एका संशोधनात दिसून आले.त्यामुळे गरज नसताना डॉक्टर मोठ्या प्रमाणात रुग्णांना कोलेस्टेरॉल कमी करण्याचे औषधोपचार देत असल्याचे स्पष्ट झाले.‘कैसर परर्मानन्ट नॉर्दन कॅलिफोर्निया डिव्हिजन आॅफ रिसर्च’ येथील एमडी अॅनल गो यांनी सांगितले की, तुलनात्मक दृष्टीकोनातून विचार केला असता हार्ट अॅटॅक होण्याचा अंदाज वास्तविक धोक्यापेक्षा पाच ते सहा पट अधिक व्यक्त करण्यात येतो. याचा अर्थ की अशा प्रकारच्या अंदाजाच्या आधारे आपण मोठ्या प्रमाणावर लोकांवर गरजेपेक्षा जास्त उपचार करत आहोत.हृदयरोगाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी ‘अमेरिकन कॉलेज आॅफ कार्डिओलॉजी अँड अमेरिकन हार्ट असोसिएशन पूल्ड कोहोर्ट रिस्क’ समीकरण वापरले जाते.2013 साली हे समीकरण वापरण्यास सुरुवात झाली होती. हृदयविकारांच्या बाबातील क्रांतीकारण पाऊल म्हणून त्यावेळी त्याचे वर्णन करण्यात आले होते.पण आता अनेक संशोधक समीकरणाच्या वैध्यताबद्दल साशंक आहेत. नव्वदच्या दशकात करण्यात आलेल्या संशोधनांवर हे समीकरण आधारित आहे ज्यामध्ये वंशीय वैविध्याचा अभाव आहे. त्यामुळे हे समीकरण सरधोपटपण सर्वांवर लागू पडत नाही.