(Image Credit : www.tlc.com)
खडकाळ जमिनीत उगवणाऱ्या बावची वनस्पतीने त्वचेवर दिसणारा वाढत्या वयाचा प्रभाव सोबतच डाग दूर केले जाऊ शकतात. बावची ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ब्रिटीश जर्नल ऑफ डर्मेटोलॉजी मॅगझिनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, भारतातील या वनस्पतीपासून तयार करण्यात आलेलं केमिकल बाकूचियाल अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-ऑक्सिडेंट आहे. याचा वापर फार पूर्वीपासून आयुर्वेदिक आणि चीनी औषधांमध्ये केला जात आहे.
तज्ज्ञांनुसार, बावची ही वनस्पती खाज, खरुज, पांढरे डाग आणि दातांचं दुखणं यावर उपाय म्हणूण वापरली जाते. बावचीच्या बीयांचा आणि मूळांचा वापर औषधांसारखा केला जातो. ही मूळं बारीक करुन तुरटीमध्ये मिश्रित करुन मंजन तयार केलं जातं. याने दातांचं दुखं, कीड आणि पायरिया समस्या दूर होते.
व्हिटॅमिन-ए पेक्षा अधिक फायदेशीर
जास्तीत जास्त स्कीनकेअर प्रॉडक्टमध्ये रेटिनॉल म्हणजेच व्हिटॅमिन ए चा वापर एक अॅंटी एजिंग म्हणून केला जातो. पण अनेकदा याचे साइड इफेक्ट त्वचेवर बघायला मिळतात. त्वचेवर लाल चट्टे येतात. काही स्कीन केअर प्रॉडक्टमध्ये व्हिटॅमिन ए चे दुसरे प्रकार रेटनल आणि रेटिनिलचा वापर केला जातो. पण गर्भवती महिलांना हे न वापरण्याचा सल्ला दिला जातो.
हे असे साइड इफेक्ट टाळण्यासाठी संशोधकांनी भारतीय वनस्पती बावचीचा वापर त्यांच्या शोधात केला. रिसर्चमध्ये ४४ लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते. त्यांना दररोज चेहऱ्यावर दोनदा ०.५ टक्के बाकूचियोल किंवा रेटिनॉल लावण्यास सांगण्यात आले. असं १२ आठवडे केलं गेलं.
संशोधकांनी चांगले परिणाम जाणून घेण्यासाठी फोटो, चर्म रोग तज्ज्ञांचा सल्ला आणि यूजर्सना केल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आणि उत्तरांचा आधार घेतला. यातून समोर आलं आहे की, दोन्ही रसायनामुळे चेहऱ्यावरील २० टक्के सुरकुत्या कमी झाल्या. ज्यांनी रेटिनॉलचा वापर केला त्यांना त्वचेवर रुतल्याची तक्रार केली. पण ज्यांनी बाकूचियोलचा वापर केला त्यांच्या सुरकुत्या आणि डाग मोठ्या प्रमाणात कमी झाले.