तेलकट त्वचा आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांमुळे अनेक महिला त्रस्त असतात. जर तेवकट त्वचेची काळजी व्यवस्थित घेतली गेली नाही तर चेहऱ्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यांची त्वचा तेलकट असते, त्यांनी चेहऱ्याच्या त्वचेची जास्त काळजी घेणं गरजेची असतं. घराबाहेर पडल्यानंतर तेलकट त्वचा असल्यामुळे चेहऱ्यावर धूळ, माती, प्रदूषण यांसारखे त्वचेसाठी घातक असलेले पदार्थ चिकटतात. चेहऱ्यासाठी घातक असणारे हे पदार्थ दूर करण्यासाठी खास फेस पॅकची गरज असते. तुम्हीही तेलकट त्वचेसाठी असेच काही बेस्ट फेस पॅक शोधत असाल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरातच बदामाचा फेस पॅक तयार करू शकता.
बदामाचा फेस पॅक तेलकट त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. हा फेसपॅक तुम्ही अगदी सहज घरीच तयार करू शकता. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, तेलकट त्वचेसाठी बदामाचा फेस पॅक फायदेशीर कसा ठरतो? जाणून घेऊया सविस्तर...
तेलकट त्वचेसाठी बदामाचा फेसपॅक का?
बदामामध्ये आढळून येणारी तत्व तेलकट त्वचेसाठी उत्तम मानली जातात. बदामामध्ये अॅन्टी-ऑक्सीडंट्स असतात. जे तेलकट त्वचेला उजाळा देण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. बदामामध्ये आढळून येणारं फॅटी अॅसिड चेहऱ्याची त्वचा व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी आणि त्वचेचा उजाळा वाढविण्यासाठी मदत करतात.
ज्यांची त्वचा ऑयली असते, त्यांना अॅक्ने आणि पिंपल्सचा जास्त धोका असतो. बदामाचा फेसपॅक चेहऱ्याचा तेलकटपणा दूर करण्यासाठी मदत करतात. चेहऱ्यावरील ओपन पोर्स व्यवस्थित स्वचछ करण्यासाठीही बदाम मदत करतं.
बदामाचा फेस पॅक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
- बदाम
- मुलतानी माती
- दही
- कच्चं दूध
असा तयार करा बदामाचा फेस पॅक :
- रात्रभर थोडे बदाम पाण्यामध्ये भिजत ठेवा.
- दुसऱ्या दिवशी सकाळी या बदामांची साल काढून क्रश करा आणि बारिक करून घ्या.
- त्यानंतर एका दुसऱ्या बाउलमध्ये थोडीशी मुलतानी माती आणि मध एकत्र करा.
- आता या मिश्रणामध्ये दही आणि सफरचंद एकत्र करा. आता यामध्ये दूध एकत्र करा.
- तयार मिश्रणामध्ये बदामाची पेस्ट एकत्र करा.
- ब्रशच्या मदतीने चेहरा आणि मानेवर पेस्ट लावा.
- चेहऱ्यावर तयार मिश्रणाची पेस्ट लावा.
- साधारणतः 15 ते 20 मिनिटं ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका.
- चेहऱ्याचा तेलकटपणा वाढला असेल तर आठवड्यातून दोन वेळा या फेस पॅकचा वापर करा.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.