केळीची साल आरोग्यवर्धक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2016 12:09 PM
केळीच्या सालीपासून विविध प्रकारचे फायदे आहेत. त्यामुळे ती साल फेकून न देता त्याचा उपयोग करावा.
केळीची साल आपण खाल्यानंतर फेकून देतो. परंतु, या केळीच्या सालीपासून विविध प्रकारचे फायदे आहेत. त्यामुळे ती साल फेकून न देता त्याचा उपयोग करावा. केळीच्या सालीपासून काय - काय फायदे होतात त्याची ही माहिती. 1 दात चमकावयचे असतील तर त्यासाठी केळीची साल ही दिवसातून दोन वेळा दातावर घासावी. त्यामुळे आपले दात चमकायला लागतील.2 काहीवेळा आपल्याला किटक चावल्यामुळे त्वचेवर फोड येऊन, आग व्हायला लागते. अशावेळेला केळीची साल त्या ठिकाणी घासली तर होणारी आग थांबते. तसेच तो फोडही नाहीसा होतो.3 केळीच्या सालीमुळे बुट व लेदरपासून बनविलेल्या वस्तूही चमकतात. त्याकरिता केळीची साल त्यावरती घासावी.4 केळीची साल व अंडे मिळून चेहºयावर लावले तर एका आठवड्यातच चेहरा उजळून निघतो. 5 आपल्या चेहºयावर किंवा शरीरावर फोड येत असतील तर त्याकरिता केळीची साल त्यावरती घासावी. त्यामुळे ते फोड नाहीसे होतात.