आपण अनेकदा एखादं प्रोडक्ट खरेदी करताना त्याची संपूर्ण माहिती जाणून घेतो आणि पूर्ण शहानिशा केल्यानंतरच ते खरेदी करतो. परंतु कोणतंही प्रोडक्ट खरेगी करण्याआधी त्यामध्ये काय वापरलं आहे, कोणत्या गोष्टी वापरून ते तयार केलं आहे, या गोष्टी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. याव्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत, ज्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स खरेदी करताना जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
इंग्रीडियंट्स तपासून पाहा
जेव्हा तुम्ही कॉस्मॅटिक प्रोडक्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही वेळ घ्या आणि सर्वात आधी ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली सामग्री तपासून पाहा. कदाचित असं असू शकतं की, प्रोडक्टमध्ये एखादी अशी गोष्ट वापरण्यात आली असेल जी तुमच्या स्किनसाठी चांगली नसेल. त्यामुळे प्रोडक्ट तयार करण्यासाठी काय साहित्य वापरलं गेलं आहे, हे तपासल्यानंतरच प्रोडक्ट खरेदी करण्याचा निर्णय घ्या.
स्किन टाइप लक्षात घ्या
आपल्या सर्वांची स्किन वेगवेगळ्या प्रकारची असते, तसेच प्रत्येक स्किनच्या गरजा वेगवेगळ्या असतात. काही लोकांची स्किन नॉर्मल असू शकते तक काहींची ड्राय, तेलकट असू शकते. त्यामुळे कोणतंही कॉस्मॅटिक प्रोडक्ट खरेदी करण्याआधी तुमची स्किन कोमत्या प्रकारची आहे, हे लक्षात घ्या. त्यानुसारच तुमच्या स्किनसाठी कॉस्मॅटिक प्रोडक्ट निवडा.
स्किन टोन
कोणतंही कॉस्मॅटिक प्रोडक्ट खरेदी करण्याआधी नेहमी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा की, तुमचा स्किन टोन काय आहे? स्किन टोन तीन प्रकारचे असतात. कूल टोन, वार्म टोन आणि न्यूट्रल टोन. जर तुम्ही तुम्हाला तुमचा स्किन टोन ओळखायचा असेल तर तुमच्या मनगटावर असलेल्या नसांचा रंग पाहा. जर तुमच्या नसा निळ्या रंगाच्या असतील तर तुमचा स्किन टोन चांगला आहे. जर त्या हिरव्या रंगाच्या दिसत असतील तर तुमचा स्किन टोन वार्म आहे. अशाप्रकारे तुम्ही तुमचा योग्य स्किन टोन ओळखून योग्य ते कॉस्मॅटिक प्रोडक्ट खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला स्वतःसाठी लाल रंगाची लिपस्टिक खरेदी करायची असेल तर सर्वात आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, तुमचा स्किन टोन काय आहे?
रिव्यू वाचा
सध्या ऑनलाइन शॉपिंग उत्तम आहे, कारण ऑनलाइन प्लॅटफॉर्म तुम्हाला अनेक वरायटी पाहायला मिळतात. परंतु, कोणतंही प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी इतर खरेदी केलेल्यांची मतं जाणून घ्या. कारण दुसऱ्या लोकांचं ओपिनियन वाचल्यानंर तुम्हाला खरचं ते प्रोडक्ट विश्वासहार्य आहे की नाही, ते जाणून घेण्यास मदत होईल.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.