वयानुसार पुरुषांच्या दाढीचे आणि मिशीचे केस पांढरे होऊ लागतात. त्यामुळे हे केस पांढरे करण्यासाठी लोक वेगवेगळे डाय वापरतात. पण तरीही अनेकांना पांढऱ्या केसांपासून सुटका मिळत नाही. पण बाजारातील महागड्या उत्पादनांवर खर्च न करता काही घरगुती उपायांच्या मदतीने हे पांढरे केस काळे करता येऊ शकतात. चला जाणून घेऊया काय आहे हे उपाय....
केस पांढरे होण्याचं कारण
वाढत्या वयासोबत शरीरातील मेलेनिनचं प्रमाण कमी होऊ लागलं त्याच कारणाने मिशी आणि दाढीचे केस पांढरे होतात. मेलेनिन एक असा घटक आहे जो त्वचेचा रंग आणि केसांचा रंग योग्य ठेवण्यात मदत करतो. पण वयानुसार मेलेनिनचं प्रमाण कमी झाल्याने केसांचा आणि त्वचेचा रंग बदलतो. त्यासोबतच तणाव, चुकीचं खाणं-पिणं, आजारी असणे आणि वृद्धापकाळ यानेही केस पांढरे होतात.
करा हे घरगुती उपाय
1) रोज पुदीना असलेला चहा घेतल्यास दाढी आणि मिशीचे केस पांढरे होणार नाहीत.
2) एक ग्लास पाण्यात कढीपत्ता टाकून ते पाणी उकळून घ्यावे. हे पाणी रोज प्यायल्यास मिशी आणि दाढीचे केस लवकर पांढरे होणार नाहीत.
3) गायीचं तूपही दाढीचे केस काळे ठेवण्यात मदत करतं. गायीच्या तूपाने रोज दाढीच्या केसांची मासिश केल्यास केसांचा काळा रंग कायम राहतो.
4) अर्धा कप पाण्यात दोन चमचे साखर घाला. यात अर्धा चमचा लिंबूचा रस मिश्रित करुन हे मिश्रण दाढीच्या केसांना लावा. याने केस काळे राहतील.
5) अर्धा वाटी पपई बारीक करुन त्यात चिमुटभर हळद आणि एक चमचा कोरफडीच्या रस मिश्रित करा. हे मिश्रण दाढीच्या केसांव लावल्यास केसांचा पांढरा रंग जाऊ शकतो.
6) कढीपत्त्याची पाने खोबऱ्याच्या तेलात टाकून उकळून घ्या. हे तेल रोज दाढी आणि मिशीच्या केसांवर लावल्यास केस काळे राहतील.
7) दोन चमचे कांद्याच्या रसात पुदीन्याची पाने मिश्रित करु दाढी आणि मिशीच्या केसांवर लावा. यानेही केस काळे राहण्यास मदत होईल.
8) आवळ्याचं पावडर आणि खोबऱ्याचं तेल मिश्रित करुन उकळून घ्या. हे तेल थंड करुन रोज दाढीच्या केसांची मालिश करा. यानेही पांढरे केस दूर होतील.