(Image Credit : Mamaearth)
बेकिंग सोडा हा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरला जातो हे तुम्हाला माहीत आहेच. पण याचा वापर केवळ किचनपर्यंतच मर्यादित नाहीये. तुम्हाला कदाचित आधीच माहीत असावं की, बेकिंग सोडा सुंदरता आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. याच्या वापर करून तुम्ही तुमचं सौंदर्य आणखी खुलवू शकता. ते कसं हे जाणून घेऊ.....
चेहऱ्याची चमक वाढवतो
ग्लोईंग आणि तरूण त्वचा प्रत्येकाला हवी असते. योग्य आहार आणि पुरेशी झोप याने तुमची त्वचा ग्लोईंग राहिलंच याची काही गॅरन्टी नाही. अशात तुम्ही त्वचेला नॅच्युरल ग्लो देण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. ऑरेंज ज्यूसमध्ये बेकिंग सोडा मिश्रित करून चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा, याने चेहऱ्यावरील ग्लो कायम राहतो.
पिंपल्सपासून सुटका
(Image Credit : Reports Healthcare)
पिंपल्स दूर करायचे असतील तर बेकिंग सोडा हा एक चांगला उपाय आहे. बेकिंग सोडा पाण्यात मिश्रित करून चेहऱ्यावर लावा. बेकिंग सोडा पाण्यात मिश्रित करून पिंपल्स असलेल्या भागांवर लावा आणि २ ते ३ मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा. काही आठवड्याने तुम्हाला याचा फायदा बघायला मिळेल.
डार्क स्पॉट्स होतात कमी
(Image Credit : Jcer.Info)
चेहऱ्यावर असलेले काळे डाग आणि पॅचेसमुळे अनेकजण नेहमीच हैराण असतात. हे डाग किंवा पॅचेस कमी करण्याचं काम बेकिंग सोडा करू शकतो. बेकिंग सोड्यामध्ये ब्लीचिंगचे गुण असतात. डार्क स्पॉट दूर करण्यासाठी एक छोटा चमचा बेकिंग सोड्यात अर्ध्या लिंबाचा रस मिश्रित करून डार्क स्पॉटवर लावा. काही वेळाने चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. हे रात्री लावणे अधिक फायदेशीर ठरेल.
ब्लॅकहेड्सपासून सुटका
(Image Credit : Dermalogica)
जर तुमची त्वचा तेलकट असेल तुम्हाला ब्लॅकहेड्स आणि पिंपल्स होण्याची समस्या सामान्य बाब आहे. ब्लॅकहेड्समुळे चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिश्रित करून ब्लॅकहे्डसवर लावा, याने तुम्हाला लवकर फरक बघायला मिळेल.
ओठ सॉफ्ट आणि सुंदर करण्यासाठी
(Image Credit : SmileDirectClub Blog)
बेकिंग सोडा तुमच्या ओठांवर आलेला एक्स्ट्रा मास दूर करण्यास आणि ओठ आणखी सुंदर करण्यात मदत करतो. ओठ सुंदर करण्यासाठी बेकिंग सोड्यात थोडं मध मिश्रित करून हलक्या हाताने ओठांवर लावा आणि काही वेळाने ओठ धुवावे. यान डेड स्कीन दूर होईल आणि ओठ सॉफ्ट होतील.
(टिप : बेकिंग सोडा हा तसा त्वचेसाठी नुकसानकारक नसतो, पण काही लोकांच्या त्वचेवर याने खाज आणि आग होऊ शकते. त्यामुळे बेकिंग सोडा चेहऱ्यावर लावण्याआधी हातावर लावून बघा. काही समस्या होत नसेल तरच चेहऱ्यावर लावा. तसेच हे चेहऱ्यावर लावण्यापूर्वी एकदा एक्सपर्टचा सल्ला नक्की घ्या.)