Beauty : सावळ्या त्वचेची आता चिंता नको, मेकअप करताना या ‘५’ गोष्टींवर द्या लक्ष !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2017 9:38 AM
आपलीही त्वचा सावळी असेल तर आम्ही आपणास काही मेकअप टिप्स देत आहोत ज्याद्वारे आपला लुक नक्कीच परफेक्ट दिसेल.
आपली त्वचा सेलिब्रिटींसारखी गोरी आणि सुंदर असावी असे प्रत्येक तरुणीचे स्वप्न असते, मात्र प्रत्येकाचीच त्वचा गोरी नसते. बऱ्याच मुली आपली सावळी त्वचा गोरी करण्यासाठी बरेच उपाय करतात, मात्र अपेक्षित लाभ मिळत नाही. आपलीही त्वचा सावळी असेल तर आम्ही आपणास काही मेकअप टिप्स देत आहोत ज्याद्वारे आपला लुक नक्कीच परफेक्ट दिसेल.* आय मेकअप रात्रीच्या पार्टीसाठी जात असाल तर ब्राउन, कॉपर, बरगंडी, डार्क मेटॅलिक, ब्लू आणि पर्पलसारखे शेड्स आय शॅडोसाठी ट्राय करा. जर दिवसा एखादे फंक्शन असेल तर पिंक आणि ब्राउन आय शॅडो ट्राय करा. * योग्य फाउंडेशनची निवड आपल्या स्किन टोननुसारच फाउंडेशनची निवड करावी. आपल्या स्किन टोनला मॅच होईल असाच फाउंडेशन घ्यावा. जर आपण आपल्या स्किन टोनपेक्षा थोडा लाइट फाउंडेशन लावाल तर स्किनवर पॅचेस दिसू लागतील, ज्यामुळे लुक खराब दिसेल. * ब्रॉन्जरचेहऱ्याला फ्रेश आणि ग्लोइंग लुक देण्यासाठी ब्रॉन्जर महत्त्वाचा घटक आहे. डार्क स्किन टोनसाठी नेहमी दोन शेड्स डार्क ब्रॉन्जरची निवड करा. याला टेम्पल्सवर लावण्याबरोबर फोरहेडवरही वापर करा.* लिपस्टिक डार्क स्किन टोनवर कधीही लाइट लिपस्टिक लावू नका. डार्क स्किन टोनसाठी बेरी, बरगंडी, प्लम, पिंक, बेज आणि कॉफीमध्ये डार्क शेड्सची निवड करा. जर आपले ओठदेखील डार्क असतील तर लिप शेड लावण्याअगोदर थोडे फाउंडेशन लावावे. * ब्लशसाठी कलर्स ब्लशसाठी अशा कलर्सचा वापर करावा जे सावळ्या स्किन टोनवर चांगले वाटतील. यासाठी आॅरेंज, कॉरल ब्राउन, डार्क पीच, ब्रॉन्ज आणि रोज यासारखे शेड सावळ्या त्वचेवर परफेक्ट दिसतील.