Beauty : दाढी-मिशीच्या पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी...!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 2:04 PM
वयोमानानुसार डोक्यावरील केस पांढरे होणे ठिक आहे, मात्र दाढी व मिशीवरील झालेले केस पांढरे थोडे कसेच वाटते.
बहुतेकजणांकडे आपण पाहिले तर त्यांचे दाढी-मिशीचे केस पांढरे झालेले असतात. वयोमानानुसार डोक्यावरील केस पांढरे होणे ठिक आहे, मात्र दाढी व मिशीवरील झालेले केस पांढरे थोडे कसेच वाटते. आपणासही ही समस्या असेल तर खालील उपाय केल्यास फायदा होऊ शकतो. काय उपाय कराल?* काही घरगुती उपाय केल्यास आपण या समस्येपासून वाचू शकतो. यासाठी चनादाळ आणि बटाटा एकत्र करुन पेस्ट तयार करावी. ही पेस्ट पांढºया केसांना लावल्यास केस काळे होण्यास मदत होईल. * पुदिन्याचा चहा पिल्याने मिशीवरील केसांचा रंग पूर्ववत होतो. या चहाचे नियमित सेवन केल्यास दाढी मिशीचा रंग पांढरा होणार नाही. * गुलाबजलमध्ये तुरटीची पावडर मिसळून दाढी-मिशीवरील पांढऱ्या केसांना लावल्यास फायदेशीर ठरते. * मूगडाळीची पेस्ट गुलाबजलात मिसळून लावल्याने दाढी व मिशीवरील पांढरे केस मुळासकट निघून जातील. हे त्वचेची गुणवत्ता वाढवण्यासाठीही उपयोगी आहे. * हळद त्वचेच्या प्रत्येक समस्येवरील उपाय आहे. यातील अॅन्टीसेप्टीक व अॅन्टीबॅक्टेरियल गुणांमुळे मिशीवरील पांढरे केस सहज निघून जातील.