शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Beauty : अस्सल महाराष्ट्रीयन रूबाबदार दाढीसाठी करा हे घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2017 7:37 AM

आपणासही झटपट दाढी वाढवायची असेल तर हे काही सहजसोपे घरगुती उपाय फॉलो केल्यास नक्कीच फायदा होईल.

-रवींद्र मोरे रूबाबदार दाढी आणि पिळदार मिशा हे अस्सल महाराष्ट्रीयन पुरूषाची ओळख समजली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील चित्रपटात मराठमोडा अभिनेता रितेश देशमुख हा मुख्य भूमिका साकारणार आहे. रितेशने या चित्रपटासाठी आपला लूक बदलला असून त्यात तो रूबाबदार दाढीत दिसणार आहे. बरेच महाराष्ट्रीयन तरुणांना रूबाबदार दाढी आणि पिळदार मिशांचे आकर्षण वाटते. आपणासही झटपट दाढी वाढवायची असेल तर हे काही सहजसोपे घरगुती उपाय दिले असून ते फॉलो केल्यास नक्कीच फायदा होईल. * आवळ्याचे तेल आवळा हे दाढी झटपट वाढवण्यास मदत करते. या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा आणि २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.मोहरीच्या पानांची पेस्ट करून त्यात आवळ्याच्या तेलाचे थेंब मिसळा. तयार मिश्रण १५ मिनिटांनी चेहऱ्याला लावा थोड्यावेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. असे आठवड्यातून ४ वेळा केल्यास तुम्हाला दाढीच्या वाढत्या केसांमधला फरक जाणवेल. हे तेल मोहरीच्या पानाच्या पेस्टबरोबरही लावू शकता. * नारळाचे तेलनारळाचे तेलामुळे दाढीची वाढ चांगल्या प्रकारे होते, त्यासाठी १० भाग नारळाचे तेल आणि १ भाग ‘रोझमेरी तेल’ घेऊन दाढीवर प्रयोग केल्यास दाढीचे केस वाढण्यास मदत होते. शिवाय यामुळे चेहऱ्याचे नुकसान होण्यापासून बचाव होतो. हे तेलाचे मिश्रण कापसाच्या बोळ्यावर घेवून चेहऱ्यावर लावा. १०-१५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.* निलगिरी तेल रोझमेरी तेलाप्रमाणे, निलगिरी तेल ही दाढीच्या केसांची वाढ होण्यास मदत करते. पण या तेलामुळे चेहऱ्याची आग होते.  म्हणूनच या तेलाबरोबर आॅलिव्ह आॅईल किंवा तीळाच्या तेलाचे काही थेंब एकत्र करा. अर्धा कप आॅलिव आॅईल किंवा तीळाच्या तेलाबरोबर १५ थेंब निलगिरीच्या तेलाचे मिश्रण करा. तयार मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावा. ३० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. जर चेहरा तेलकट वाटत असेल तर तो साबणाने पुन्हा धुवा.* तमालपत्र आणि लिंबूतमालपत्राची पावडर आणि दोन चमचे लिंबाचा रस हे मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. हा उपाय सगळ्यांनाच लागू पडत नाही. कारण काही जणांच्या त्वचेला लिंबाचा रस संवेदनशील ठरण्याची शक्यता असते. जर तुम्हांला काही त्रास झाल्यास हे मिश्रण लावू नका. तर इतरांनी हे मिश्रण आठवड्यातून दोनवेळा चेहरयाला लावा.Also Read : ​Beauty Tips : रुबाबदार दाढीसाठी सेलिब्रिटीदेखील करतात हे उपाय !