Beauty : या घरगुती फेसपॅकने पुरुष बनतील अधिक स्मार्ट !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 6:27 AM
आपणही सेलिब्रिटींसारखे स्मार्ट दिसावे, असे बहुतांश तरुणांना वाटते. त्यासाठी ते प्रयत्नही करतात, मात्र अपेक्षित फायदा होत नाही. कारण पुरुषांची त्वचा स्त्रियांच्या त्वचेपेक्षा वेगळी असते. पुरुषांच्या त्वचेसाठी वेगळ्या उपचारांची गरज असते.
सौंदर्य आणि सेलिब्रिटी हे जणू समिकरणच आहे. विशेषत: त्यांच्या सौंदर्यामुळे त्यांचे वाढते वय देखील जाणवत नाही. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, बहुतेक सेलेब्स महागड्या आणि केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांपेक्षा घरगुती उपायांवर जास्त भर देत असतात. त्यांनाही आता नैसर्गिक साधनांचे महत्त्व पटू लागले आहे. ते नैसर्गिक साधनांचा वापर करुनच आपले सौंदर्य खुलवत असतात. आपणही सेलिब्रिटींसारखे स्मार्ट दिसावे, असे बहुतांश तरुणांना वाटते. त्यासाठी ते प्रयत्नही करतात, मात्र अपेक्षित फायदा होत नाही. कारण पुरुषांची त्वचा स्त्रियांच्या त्वचेपेक्षा वेगळी असते. पुरुषांच्या त्वचेसाठी वेगळ्या उपचारांची गरज असते. काही त्वचा तज्ज्ञांच्या मते, पुरुषांच्या त्वचेच्या समस्यांसाठी कडूलिंब व दह्याचा फेसपॅक सर्वोत्तम आहे. शेकडो वर्षांपासून त्वचारोगांसाठी कडूलिंबाचा वापर होत आहे. कडूलिंबात अँटीबॅक्टेरियल व अँटीफंगल गुण असतात. यामुळे अनेक आजार व इन्फेक्शन दूर होतात. दहीदेखील त्वचा स्वस्थ ठेवण्यास उपयोगी आहे.* पुरुषांसाठी फेसपॅक कसा बनवावा ? कडूलिंबाची २०-२५ पाने वाटून पेस्ट बनवावी. या पेस्टमध्ये एक चमचा दही मिसळा. हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करावे. * कसा लावावा फेसपॅक ?हा फेसपॅक हलक्या हातांनी मसाज करून चेहऱ्यावर लावावा. हा पॅक आपल्या चेहऱ्यावर किमान १० मिनिट राहू द्यावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. हा पॅक आठवड्यातून किमान दोनदा तरी लावावा. * काय होतील फायदे ? * कडूलिंब व दह्यातील विटॅमिन व पोषण मूल्ये त्वचेवरील पेशींना हेल्दी बनवतात. यामुळे त्वचारोगापासून बचाव होतो. * नियमित लावल्यास या पॅकमुळे डोळ्याखालील वर्तुळ दूर होतात. * हा फेसपॅक सनस्क्रीनप्रमाणे काम करतो. यामुळे सूर्याच्या अल्ट्रा व्हॉयलेट किरणांपासून रक्षण होते. * हा फेसपॅक त्वचेवरील डॅमेज टिशूंना दुरुस्त करतो. यामुळे टॅनिंग कमी होते. * या फेसपॅकमुळे चेहरऱ्यावरील बॅक्टेरिया कमी होऊन मुरुमांची समस्या नष्ट होते. * यातील तत्व त्वचेला स्वच्छ करून ब्लॅक हेड घालवतात.