शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

Beauty : मेकअप करताना काळजी घेतली नाही तर...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 9:34 AM

प्रत्येक महिलेला वाटते आपण सर्वात सुंदर दिसावे. यासाठी त्या मेकअप करण्यावर भर देतात. पण मेकअप कसाही करुन चालत नाही तर तो परफेक्टच करणे आवश्यक आहे. यावेळी छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. कारण लहानशी चूकही तुमचा संपूर्ण लूक खराब करू शकते.

प्रत्येक महिलेला वाटते आपण सर्वात सुंदर दिसावे. यासाठी त्या मेकअप करण्यावर भर देतात. पण मेकअप कसाही करुन चालत नाही तर तो परफेक्टच करणे आवश्यक आहे. यावेळी छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. कारण लहानशी चूकही तुमचा संपूर्ण लूक खराब करू शकते.सर्वप्रथम कपाळ, गाल, डोळे, नाक, हनुवटी आणि मानेवर क्लिझिंग क्रीमने संपूर्ण चेहरा मसाज केल्यासारखा हात फिरवा. यानंतर ओल्या कापसाने ही क्रीम व्यवस्थित काढून घ्या. अशा पद्धतीने चेहरा स्वच्छ करून घ्या. यानंतर स्कीन फ्रेशनरने चेहरा पुन्हा स्वच्छ करावा. कोरडी त्वचा असेल, तर कापसाने चेहऱ्यावर मॉईश्चराजर लावावे. त्वचेच्या प्रकारानुसार (तेलकट, कोरडी, नॉर्मल) व रंगानुसार फाउंडेशनची निवड करावी. दिवसा मेकअप करताना तो कधीच खूप डार्क करू नये. नेहमी लाईट किंवा माध्यम स्वरुपाचा करावा. काजळाचा उपयोग गरजेचा आहे, पण मस्कारा वापरण्याची आवश्यकता नाही. दिवसाच्या मेकअपसाठी आयशॅडोचा रंग तुमच्या डोळ्याच्या रंगाशी मिळताजुळता किंवा एक शेड लाईट अशीच हवी. यावेळी गडद रंगाचे आयशॅडो वापरू नका तर न्युट्रल कलर वापरा. रात्री मेकअप काढूनच झोपा. यासाठी फक्त पाण्याचा उपयोग करू नका. तर मेकअप काढण्यासाठी क्लिंझरचा अवश्य वापर करा. अनेक जणींना लिपस्टीक लावायची सवय असते. प्रसंगी लिपस्टिक लावणाऱ्यांनी या काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. जाड ओठ असणाऱ्यांनी लिप लायनरच्या मदतीने बारीक, अरूंद आउटलाईन काढून घ्यावी. अन्यथा ओठ खूप जाड दिसतात. लांब ओठ असलेल्यांनी जाडसर आउटलाईन काढावी. याचप्रमाणे आउटलाईन काढताना योग्य काळजी घ्यावी. शक्य असल्यास आउटलाईनसाठी वापरण्याचा रंग फिका असावा. प्रसंगाला साजेसा रंग निवडावा. तसेच तो रंग तुमच्या कपड्यांवर शोभून दिसायला हवा. जर गडद रंगाचे लिपस्टिक असेल तर हलक्या रंगाचे लाईनर असावे. आजकाल अनेक जणी क्रीम बेस लिपस्टिक लावणे पसंत करतात. हे सुंदर व ट्रेंडी दिसते. दीर्घकाळ फ्रेश दिसते. लिपस्टिक विविध रंगात उपलब्ध असतात. परंतु ते वापरताना अधिक सतर्क राहणे आवश्यक असते. जर लिपस्टिक तुमच्या ओठांची ठेवण व त्वचेच्या रंगाला शोभत नसेल तर ते विचित्र दिसते. तोच रंग वापरण्याऐवजी नियमितपणे रंग बदलवा. लिपस्टिक लावल्यानंतर एक मिनिटाने ओठांना आईसक्रीम लावा. असे केल्याने लिपस्टीक जास्त काळ टिकून राहील.