Beauty : चेहरा धुताना पुरुषांकडून होतात ‘या’ चुका !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 9:09 AM
चेहरा धुताना कोणत्या चुका टाळायला हव्यात, याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या...!
आपल्या आवडत्या अभिनेत्यासारखा आपलाही चेहरा सुंदर दिसावा असे बहुतांश तरुणांना वाटते. मात्र चेहऱ्याची योग्य काळजी न घेतल्याने आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खालावते. त्यांच्या चेहऱ्याचे सौंदर्य त्यांच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने जवळपास सर्वच सेलिब्रिटी आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यावर अधिक भर देतात. सेलिब्रिटींचे अनुकरण करु नच बरेचजण आपल्याही चेहऱ्याचीही काळजी घेतात, त्यासाठी ते प्रयत्नही करतात मात्र सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात फेसवॉशने चेहरा धुतला की काम संपले, असे त्यांना वाटते. त्यासाठी घाईगडबडीत आपण कोणताही फेसवॉश खरेदी करतो आणि त्याचा वापर चेहरा धुण्यासाठी करतो.आपल्या त्वेचेची माहिती न घेताच आपण फेसवॉश वापरायला सुरुवात करतात. बहुतांशवेळा ही चूक पुरुषांकडून होते. ज्याचा उलट परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो.चेहरा धुताना कोणत्या चुका टाळायला हव्यात, याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. * योग्य फेशवॉशची निवड चेहऱ्याच्या त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन फेसवॉश घेतला नाही तर फायद्याऐवजी नुकसानच जास्त होते. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची योग्य काळजी घ्यायची असेल तर योग्य फेसवॉश निवडा. ज्यामुळे चेहऱ्याचा pH संतुलित राहतो. * पाण्याचे तापमानचेहरा धुताना लक्षात ठेवा, की पाणी जास्त गरम किंवा थंड असू नये. जास्त गरम आणि जास्त थंड पाण्याचा परिणाम चेहऱ्याच्या त्वचेवर होतो. त्यामुळे आपले सौंदर्य खालावते. * फेसवाश लावल्यानंतर चेहरा लगेच धुवू नकाबऱ्याचदा आपण चेहऱ्याला फेसवॉश लावल्यानंतर लगेचच चेहरा धुतो. मात्र तसे न करता तुमच्या चेहऱ्याला योग्य प्रमाणात पोषण मिळण्यासाठी चेहरा काही वेळ तसाच ठेवा आणि नंतर चेहरा धुवून टाका. * सकाळ-संध्याकाळ चेहरा धुवाचेहऱ्याच्या सौंदर्यासाठी चेहऱ्याची स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. त्यासाठी चेहऱ्याला सकाळ आणि संध्याकाळ धुवायला हवे. बहुतांश मुले हे करायला विसरतात. त्यामुळे त्यांच्या चेहरा व्यवस्थित स्वच्छ होत नाही आणि पिंपल्स तयार होतात. यामुळे आपला चेहरा विद्रुप दिसू लागतो. Also Read : Beauty : दाढी मऊ ठेवण्यासाठी खास टिप्स ! Beauty : या घरगुती फेसपॅकने पुरुष बनतील अधिक स्मार्ट !