Beauty : सेलिब्रिटीसारखी परफेक्ट शेविंग हवीय? या आहेत खास ‘स्टेप्स’ !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2017 10:39 AM
शेविंग करण्याच्याही खास स्टेप्स आहेत, ज्या फॉलो केल्यास परफेक्ट शेविंग होते.
आपल्या आवडत्या अभिनेत्याचे अनुकरण आपण कळत-नकळत करीत असतो. त्याचे राहणीमान, त्याचे दिसणे, उठणे, बसणे एकंदरीत त्याच्या लाइफस्टाइलचे निरिक्षण करुन आपणही तसेच वागण्याचा प्रयत्न करीत असतो. विशेषत: पुरुष वर्ग आपल्या आवडत्या हिरोने शेविंग कशी केली आहे याचे निरिक्षण जास्त करतो. आज आम्ही याच विषयाची माहिती देत आहोत. सेलिब्रिटींसाठी त्यांचा लुक अतिशय महत्त्वाचा असतो, त्यामुळे ते शेविंग करताना खूपच काळजी घेतात. शेविंग करण्याच्याही खास स्टेप्स आहेत, ज्या फॉलो केल्यास परफेक्ट शेविंग होते. * स्टेप १शेविंग करण्याअगोदर चेहऱ्याला चांगल्या प्रकारे पाण्याने धुवून स्वच्छ करा. यामुळे जरी ब्लेड लागले तरी संक्रमण होण्याची भीती नसते. सोबतच आपण रफ एक्सफोलीएटिंग क्रीमने एक्सफोलीएटदेखील करु शकता. * स्टेप २दाढीला नरम करण्यासाठी फेसक्लॉथला कोमट पाण्यात भिजवून ३० सेकंदापर्यंत आपल्या दाढीवर ठेवा. यामुळे त्वचा आणि केस नरम होतात. * स्टेप ३हातावर शेविंग क्रीम घेऊन चेहऱ्यावर आणि गळ्यावर अपवॉर्ड सर्कुलर मोशनमध्ये चांगल्याप्रकारे लावा. ज्याठिकाणी केस आहेत त्याठिकाणी क्रीम लागेल याची काळजी घ्या. क्लोज आणि आरामदायक शेविंगसाठी नव्या रेजरचाच वापर करावा. * स्टेप ४गळ्यावरील शेविंग करण्यासाठी गळ्याच्या खालच्या भागापासून वरच्या बाजूने शेविंग करावे. याने रेजर बर्न आणि इनग्रोन हेअरची समस्या उद्भवत नाही. * स्टेप ५ क्लोजर शेविंगसाठी आपण आपल्या हाताने त्वचेला मुलायम करु शकता. * स्टेप ६प्रत्येक स्ट्रोकनंतर रेजरला धुणे विसरु नका, नाहीतर केसांमुळे ते जाम होऊ शकते. * स्टेप ७चेहऱ्यावरील अतिरिक्त शेविंग क्रीमला कोमट पाण्याने धुवावे. ज्याठिकाणी क्रीम लागलेली नसेल त्याठिकाणी पुन्हा रेजर ओले करुन शेविंग करा. * स्टेप ८शेविंगनंतर अल्कोहोलयुक्त आफ्टरशेवच्या ऐवजी अशा टोनरचा वापर करा, ज्यात विटॅमिन आणि ऐलोवेराचा अर्क असेल. शेविंग पूर्ण झाल्यानंतर मॉइस्चराइजर्सचा वापर करा. Also Read : Beauty : दाढी करण्यापूर्वी कोरफड लावल्यास होणारे फायदे जाणून व्हाल थक्क ! : YOUNGER LOOK : दाढी करण्यापूर्वी लिंबू लावा आणि तरुण दिसा !