आपलं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकजण निरनिराळे उपाय करत असतात. त्यासाठी बाजारात मिळणारी उत्पादनं किंवा घरगुती पदार्थांचा वापर केला जातो. पण प्रत्येक वेळी हे उपाय करणं शक्य होत नाही. अनेकदा वेळेअभावी हे उपाय करणं शक्य नसतं. अशाही काही टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही सुंदर दिसू शकता. फार कमी वेळात करता येण्याजोगे हे उपाय काय आहेत याबाबत जाणून घेऊयात...
वॅक्सिंगऐवजी शेविंग करत असाल तर कंडिशनरचा वापर करा
वॅक्सिंगऐवजी शेविंगचा पर्याय वापरत असाल तर त्यामुळे स्किन मुलायम राहत नाही. तुम्हालाही असं वाटतं का? असं असेल तर तुम्ही योग्य प्रकारे शेविंग करत नाही. शेविंग करण्यासाठी केसांचं कंडिशनर वापरलं तर अंगावरील केस सॉफ्ट होतात आणि शेव्ह करणं सोपं जातं.
दात चमकदार करण्यासाठी
अनेकदा आपण चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी मेकअप करतो पण अशात आपण आपल्या दातांकडे दुर्लक्ष करतो. आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यामध्ये दातांचाही समावेश असतो. पिवळ्या दातांमुळे तुमचं फर्स्ट इंप्रेशन खराब होण्याची शक्यता असते. अशातच पिवळे झालेले दात पांढरेशुभ्र आणि चमकदार करण्यासाठी बेकिंग सोडा हा उत्तम पर्याय आहे. एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साइडचे 2 ते 3 थेंब टाका. याची पेस्ट तयार करून घ्या आणि ती दातांवर लावा.
पिंपल्सवर रामबाण उपाय
प्रत्येक तरूणी आपल्या चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सच्या समस्येनं चिंतीत असतात. या पिंपल्सवर रामबाण उपाय म्हणून मधाचा वापर करता येतो. मधामध्ये अॅन्टीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे दररोज चेहऱ्यावर मध फेसपॅकप्रमाणे लावले तर त्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होते.
तांदळाचा वापर
केसांना मुलायम आणि चमकदार करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या हेअर कंडिशनरऐवजी तांदळाच्या पाण्याचा वापर करणं फायदेशीर ठरतं. शॅम्पू केल्यानंतर तांदळाच्या पाण्यानं केस धुतल्याने केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासही मदत होते.
पेट्रोलियम जेली
जर तुम्हाला चेहरा नॅचरल ग्लो करावा असं वाटत असेल तर घरातून वाहेर पडताना थोडी पेट्रोलिअम जेली आपल्या गालांवर लावा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो वाढविण्यास मदत होईल.