जर तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स असतील आणि तुम्ही ते दूर करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर वेळीच सावध व्हा. हे डार्क सर्कल्स फक्त चेहऱ्याचं सौंदर्य कमी करत नाहीत तर तुमच्या आरोग्याबाबतही अनेक गोष्टी सांगतात. डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या किंवा काळी वर्तुळं आरोग्याच्या अनेक गोष्टी सांगतात. यामुळे आरोग्य बिघडतं पण चेहऱ्याचं सौंदर्यही कमी होतं. जाणून घेऊया डार्क सर्कल्स किंवा सुरकुत्या उद्भवण्याची कारणं आणि त्यावरील उपाय...
डार्क सर्कल्स उद्भवण्याची मुख्य कारणं -
- सतत तणावात राहणं
- शरीरात पोषणाची कमतरता असणं
- शांत झोप न लागणं
- हार्मोन्समध्ये परिवर्तन होणं
- अनियमित जीवनशैली
- शरीरातील पाण्याची कमतरता
दरम्यान, बाजारात अनेक प्रोडक्ट्स आहे. जे डार्क सर्कल्स दूर करण्याचा दावा करतात. परंतु, केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करण्याऐवजी तुम्ही काही घरगुती उपायांच्या मदतीने डार्क सर्कल्स दूर करू शकता. लक्षात ठेवा की, जर एखाद्या आरोग्याच्या समस्येमुळे जर डार्क सर्कल्स किंवा सुरकुत्या उद्भवत असतील तर घरगुती उपायांऐवजी एक्सपर्ट सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. जाणून घ्या घरगुती टिप्स...
टोमॅटोचा वापर करून डार्क सर्कल्स करा दूर...
डार्क सर्कल दूर करण्यासाठी टोमॅटो सर्वात फायदेशीर ठरतो. डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर करण्यासोबतच टोमॅटो, त्वचा मुलायम करण्यासाठीही मदत करतो. टोमॅटोचा रस लिंबाचे काही थेंबांसोबत एकत्र करून लावल्याने फायदा होतो.
बटाटा ठरतो फायदेशीर...
डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी बटाट्याचाही वापर तुम्ही करू शकता. बटाट्याचा रसामध्ये लिंबाचे काही थेंब एकत्र करून कापसाच्या मदतीने डोळ्यांखाली लावा. त्यामुळे सुरकुत्या आणि काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होते.
टी बॅग्स दूर करतील सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स
टी-बॅग्स वापरल्यानंतर डार्क सर्कल्स लवकर दूर होतात. टी-बॅग काही वेळासाठी पाण्यामध्ये बुडवून ठेवा. त्यानंतर फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. काही वेळानंतर हे बाहेर काढून डोळ्यांवर ठेवा. 10 मिनिटांपर्यंत असं केल्याने फायदा होतो.
थंड दूधाचा लेप आणि मसाज
थंड दूधाचा लेप डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. कच्च दूध थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर कापसाच्या मदतीने डोळ्यांखाली लावा. असं दिवसातून दोन वेळा केल्याने फायदा होतो.
संत्र्याची साल आणि गुलाबपाणी
संत्र्याची साल सुकवून वाटून घ्या. तयार पावडरमध्ये थोड्या प्रमाणावर गुलाब पाणी एकत्र करून डोळ्यांखाली लावा. डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर होतील.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)