Beauty : केस गळती आणि पांढऱ्या केसांच्या समस्येवर हा आहे खास पॅक !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2017 8:23 AM
या पॅकमुळे नुसती केस गळतीच थांबत नाही तर पांढऱ्या केसांची समस्याही दूर होते. शिवाय केस घनदाट होण्यास मदत होते.
पावसाळ्यात प्रत्येक व्यक्तीला कामानिमित्त बाहेर पडावे लागते. त्यात सेलिब्रिटींचे शूटिंग आलेच. बऱ्याचदा सेलेब्स शूटिंगदरम्यान किंवा बाहेर फिरताना पावसात भिजतात. पावसाच्या पाण्याचा परिणाम होऊन केस गळतीची समस्या उद्भवते. मात्र तरीही सेलेब्सचे केस नेहमी हेल्दी आणि मजबूत दिसतात. ही समस्या जास्त भेडसावू नये म्हणून सर्वच सेलेब्स केसांची विशेष काळजी घेतात. त्यात त्या विशेष घरगुती उपायांवर भर देतात. पावसाळ्यात आंबे सहज उपलब्ध होत असल्याने बहुतांश केस गळतीच्या समस्येवर मॅँगो (आंब्याचा) हेअर पॅक वापरण्यात येतो. या पॅकमुळे नुसती केस गळतीच थांबत नाही तर पांढऱ्या केसांची समस्याही दूर होते. शिवाय केस घनदाट होण्यास मदत होते. * मॅँगो हेअर पॅक बनविण्याची पद्धत आंब्याचा गर काढून पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये थोडी दही आणि एक चमच बदाम तेल टाकून पॅक तयार करा. या पॅकला केसांना लावून कारडे होऊ द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हा मॅँगो पॅक केसांना नैसर्गिकरित्या कंडिशनिंग करुन त्यांना मुळापासून मजबूत बनवतो. या मॅँगो हेअर पॅकमुळे केसांना आवश्यक पोषण मिळते. त्यामुळे केस हेल्दी होऊन केसांना चकाकी मिळते. याशिवाय आपणास केसांतील कोंड्याच्या समस्येवरही सुटका मिळते. या पॅकमध्ये विटॅमिन 'ए' आणि 'सी' असल्याने केस अवेळी पांढरे होत नाहीत. या पॅकचा वापर आठवडा जरी केला तरी आपणास याचा चांगला परिणाम दिसून येईल. विना खर्चाचा आणि नुकसानरहित हा उपाय आपणही घरच्या घरी केला तर आपले केस हेल्दी होण्यास मदत होईल. Also Read : HEALTH : पिकलेल्या केसांपासून मिळवा मुक्ती ! : Beauty : दाढी-मिशीच्या पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी...!