शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

​Beauty : दिवाळीत असे खुलवा सौंदर्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 6:18 AM

यंदाच्या दिवाळीत सौंदर्य खुलविण्यासाठी आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपण दिवाळी अधिक सुंदर दिसाल.

-रवींद्र मोरे दिवाळी सण म्हटला म्हणेज रोषणाई, खरेदी, विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ बनविणे शिवाय घराची साफ-सफाई या व अशा प्रकारच्या अनेक कामांना अक्षरश: उधाण आलेले असते. विशेषत: बॉलिवूड तसेच मराठी कलाकारांचीही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असते. मात्र दिवाळीपूर्व तयारी करण्यात बऱ्याच महिला एवढ्या व्यस्त होतात की, त्यांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नसतो. कामाच्या घाईगडबडीत झालेल्या दुर्लक्षामुळे ऐन दिवाळीत तिचा चेहरा पार कोमेजून जातो. अशा कोमेजलेल्या चेहऱ्यावर कितीही मेकअप केला तरीही तो खुलून दिसत नाही. सजण्यातच स्त्रीचे सौंदर्य सामावले आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत सौंदर्य खुलविण्यासाठी आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपण दिवाळी अधिक सुंदर दिसाल. * कामाच्या व्यापात झालेल्या दुर्लक्षामुळे चेहऱ्यावर मृत त्वचा तयार होते. त्यासाठी बेसन, हळद, गुलाबाचे पाणी व दुधावरची साय एकत्र करुन लेप तयार करा व तो चेहऱ्यावर लावा. या लेपाने धुळ व माती तसेच चेहऱ्यावरील मृत त्वचा निघण्यास मदत होते. त्यानंतर कोणत्याही कोल्डक्रिमने चेहऱ्यावर तसेच मानेवर मॉलिश करून ५ मिनिटे वाफ घ्या. * चेहऱ्याचे सौंदर्य टिकविण्यासाठी हा लेपही महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी २ चमचे मुलतानी माती, १ चमचा मध, २ चमचे गुलाबाचे पाणी, १ चमचा चंदन पावडर यांचे दह्यात मिळवून लेप बनवून घ्या. हा लेप चेहरा, गळा व मानेला लावून घ्या. सुकल्यावर चेहरा धुऊन घ्या. चेहरा उठून दिसेल.  * संपूर्ण सौंदर्यासाठी हात आणि पायांचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कोमट पाण्यात एक चमचा शॅम्पू, ३ ते ४ थेंब लिंबू व चिमूटभर मीठ टाकून या पाण्यात हात व पाय १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवा. नंतर ब्रशच्या साह्याने मृत त्वचा काढून टाका. हाथ व पाय साध्या पाण्याने धुऊन मॉयश्चराइजर लावा. तुमचे हात व पाय सुंदर व कोमल दिसू लागतील. * दिवाळीत आपली वेशभुषादेखील अत्यंत महत्त्वाची असते. दिवाळीसारख्या शुभप्रसंगी घागरा, राजस्थानी ड्रेस, गुजराती साडी किंवा यासारखा तुम्हाला आवडणारे विशेष ड्रेस परिधान केले तर तुमचे रूप अजूनच खुलून दिसेल. * सौंदर्यात दागिन्यांचीही मोठी भूमिका असते. त्यासाठी दागिने निवडताना परंपरागत साडीसोबत टिकली, नथ, कानांमध्ये झुमके, खड्याच्या किंवा मोतीच्या बांगड्या, पायात जाडसर किंवा मोतूचे पैंजण व कमरेत झुमका या गोष्टींना प्राधान्य दिले तर तुम्ही सर्वांपेक्षा वेगळ्या दिसाल. हे दागिने सध्या कमी किंमतीत व परवडतील अशा भावात इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात सहज उपलब्ध आहेत. * सौंदर्यासाठी चेहऱ्याच्या त्वचेची काळजी, वेशभुषा तसेच दागिन्यांबरोबरच केशरचनाही तेवढी महत्त्वाची असते. यासाठी तुमच्या या सुंदर रूपावर तुम्हाला शोभेल व आवडेल अशी कोणतीही केशरचना करून स्वत:चे सौंदर्य वाढवा. चेहऱ्याच्या ठेवणीनुसार सैल वेणी, अंबाडा किंवा सागर वेणी यांची निवड करू शकता. या वेणीला बीड्स, मोती किंवा फुलानी सजवा. * सगळ्यात शेवटी चेहऱ्याचा मेकअप करा. त्यासाठी सगळ्यात आधी चेहऱ्यावर बर्फ चोळा. याने तुमचा मेकअप जास्त वेळ टिकून राहील. नंतर चेहऱ्यावर मॉयश्चराइजर लावा. नंतर तुमच्या रंगाला शोभून दिसेल त्या रंगाचे फाउंडेशन लावा. कॉम्पॅट पावडरने चेहऱ्याला 'एक्स्ट्रा टच' द्या. नंतर टाल्कम पावडर लावा. कपाळावर व नाकावर ड्रेसाच्या रंगाला मँचिंग ब्लशर लावा. नंतर डोळवांवर आयशॅडो लावा.डोळ्यांना व्यवस्थित आकार देण्यासाठी आयलाइनर किंवा आय ब्रो पेंसिलचा वापर करा. नंतर पापण्यांवर मस्करा लावा. सगळ्यात शेवटी तुमच्या कपड्यांच्या रंगाशी मेळ खाणारी लिपस्टिक व सुंदर टिकली लावा. आता पहा सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच खिळून रहातील. आणि हो तुमच्या चेहºयावरील तुमचे हास्य तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी उठावदार बनवेल.