Beauty : ‘या’ अॅक्सेसरीजने मिळवा आकर्षक हेअरस्टाइल !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 12:36 PM
हेअरस्टाइल आकर्षक दिसण्यासाठी योग्य हेअर अॅक्सेसरीजची निवड करता यायला हवी. चला जाणून घेऊया कोणत्या अॅक्सेसरीजने आपली हेअरस्टाइल आकर्षक दिसेल.
हटके लुक दिसण्यासाठी आपली हेअरस्टाइल महत्त्वपूर्ण ठरते. प्रसंगानुसार वेगवेगळी हेअरस्टाइल असणे हेदेखील तेवढेच महत्त्वाचे. मात्र हेअरस्टाइल आकर्षक दिसण्यासाठी योग्य हेअर अॅक्सेसरीजची निवड करता यायला हवी. आपण चित्रपटात किंवा हायप्रोफाइल पार्ट्यांमध्ये सेलिब्रिटींची हेअरस्टाइल पाहत असाल. त्यांच्या हेअरस्टाइलनुसारच अॅक्सेसरीजचा वापर केलेला असतो, म्हणून त्यांची हेअरस्टाइल आकर्षक दिसते. आज मार्केटमध्ये विविध स्टाइलमध्ये या अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या अॅक्सेसरीजने आपली हेअरस्टाइल आकर्षक दिसेल. * एम्ब्रॉयडरी हेअरबँड एथनिक लुक हवा असल्यास वर्क केलेले हेअरबँड्स वापरू शकता. हे जरा हटके दिसतात. याव्यतिरिक्त प्रिंटेट किंवा वेलवेटचे हेअरबँड्सही उत्तम पर्याय आहेत.* क्लचर्स सध्या बाजारात फंकी क्लचचा ट्रेंड चालू आहे. विविध आकारात, रंगात आणि प्रकारात असे क्लच उपलब्ध आहेत. तुम्हाला नवीन हेअर स्टाईल करतानाही याचा उपयोग होतो. यामुळे स्टाईलाही वेगळाच लुक येतो आणि तुम्ही उठून दिसता.* बोडिझाईनर बो सध्या फॅशनमध्ये आहे. याचा उपयोग केवळ फॉर्मल्सवर नाही तर इतर ड्रेससबरोबरही करता येईल. मॅचिंग बो सहज उपलब्ध होतात. यामुळे कमी वेळेत पोनीटेल घालण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच हे आकर्षकही दिसते.* हेअर बेल्ट्स केस कमी असल्यास किंवा मोकळे सोडण्यासाठी याचा चांगलाच उपयोग होतो. तुम्ही यामुळे केसांना वेगळा लुकही देऊ शकता. * हेअरबँडमेटालिक, गोल्डन, सिल्वर, ब्रास किंवा इतर कोणत्याही धातूचे ट्रेंडी हेअरबँड्स मिळतात. हे पारंपरिक किंवा कोणत्याही कपड्यावर चालतात. यामुळे हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.Also Read : Beauty : प्रसंगानुसार अशी असावी पुरुषांची परफेक्ट हेअरस्टाइल ! : मॅसी हेअरस्टाइलने मिळवा हटके लूक !