Beauty : सौंदर्य खुलविण्यासाठी 'ही' गोष्ट अति महत्वाची !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2017 12:47 PM
आपले खरे सौंदर्य आपल्या शारीरिक स्वच्छतेवर आणि प्रसन्नतेवर आधारित असते आणि या गोष्टी मिळतात त्या स्रानाने.
आपण एखाद्या अभिनेत्रीसारखे सुंदर दिसावे, आपल्या सौंदर्याचे चारचौघात कौतुक व्हावे असे प्रत्येक तरुणीला वाटत असते. त्यासाठी आपण खूप प्रयत्नही करतो, मात्र आपले खरे सौंदर्य आपल्या शारीरिक स्वच्छतेवर आणि प्रसन्नतेवर आधारित असते आणि या गोष्टी मिळतात त्या स्रानाने. स्रान या शब्दाचा अर्थ फक्त साबण लावून पाणी ओतणे हा नसून यात संपूर्ण शरीराची स्वच्छता होणे अपेक्षित आहे. सौंदर्यशास्त्राच्या दृष्टिने अतिशय गरम किंवा अगदीच थंड पाण्याने आंघोळ करणे चुकीचे आहे. थंड पाण्याने त्वचा कोरडी होते, तर गरम पाण्यातने त्वचेवर सुरकुत्या पडतात. कोमट पाणी वापरणे सर्वोत्तम आंघोळीच्या पाण्यात कृत्रिम सुगंध न मिसळता नैसर्गिक सुगंधी तेलांचा वापर करावा. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी रंध्रे मोकळी करावी लागतात, त्वचेवर धूळ आणि मृत पेशी चिकटून छिद्रे बंद होतात. त्यामळे रोगही पसरतात. त्वचा काळसर दिसायला लागते. यावर आंघोळ हा सर्वोत्तम उपाय आहे. टीव्हीवर भलेही विविध साबणांची भलामण करणाºया जाहिराती आल्या तरी आपण साबणाचा शक्य तितका कमी उपयोग करावा. कारण साबणात स्वच्छतेपेक्षा सुंगधाकडेच लक्ष दिले जाते. खरे तर वापरण्यासाठी बेबी सोप चांगला. हे हास्यास्पद वाटेल पण खरे आहे. कारण तीव्र स्वरूपाचे आणि तीव्र सुंगध घातलेले साबण वापरल्याने आम्ल आवरणाची क्षती होऊन सूक्ष्म जीवजंतूपासून त्वचेचे पुरसे संरक्षण होत नाही. म्हणून आवड्यातून एकदाच साबण वापरावा आणि इतर दिवस नैसर्गिक साधनांचा वापर करून आंघोळ करावी. पूर्वीच्या काळी लोकांची त्वचा आपल्यापेक्षा मऊसर होती. कारण त्यावेळी साबणांचे प्रकार नव्हते. त्यावेळी फक्त नैसर्गिक साधनांचा वापर केला जायचा. म्हणून आता सौंदर्य वाढवण्यासाठी प्रथम आंघोळीकडे लक्ष द्या. नैसर्गिक साधनांचा वापर त्वचेचे संरक्षण करेल.Also Read : health : रात्री अंघोळ करण्याचे आहेत अनेक फायदे ! : BEAUTY TIPS : सौंदर्य खुलविण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात ‘हे’ पदार्थ मिसळा !