BEAUTY TIPS : तांदूळ पासून ते बदामापर्यंत, चेहऱ्याची चमक वाढवतिल ‘हे’ १० नैसर्गिक फ़ॉर्मूले !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2017 12:37 PM
स्किन नैसर्गिक गोरी आणि हेल्दी होण्यासाठी जाणून घ्या १० नैसर्गिक फॉर्मूले आणि त्यांचा वापर करण्याच्या योग्य पद्धती.
-Ravindra Moreअसे बरेच पदार्थ आहेत, ज्यामुळे स्किन नैसर्गिक गोरी आणि हेल्दी होण्यास मदत होते. फक्त गरज आहे, त्यांच्या कॉम्बिनेशनची योग्य पद्धत जाणून घेण्याची. चला मग जाणून घेऊया ते १० नैसर्गिक फॉर्मूले आणि त्यांचा वापर करण्याच्या योग्य पद्धतींबाबत. १) तांदूळ, दूध आणि मधचार चमच उकळलेले तांदूळ, एक चमच दूध आणि एक चमच मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यावर धुवा. यामुळे स्किन यंग आणि सॉफ्ट होते शिवाय चेहऱ्यावरील डागही नाहिसे होतात.२) बदाम, निंबू आणि मधएक चमच बदामच्या पेस्टमध्ये निंबूचा रस आणि एक चमच मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटानंतर धुवा. यामुळे स्किनचे टेक्सचर सुधारते. रंग गोरा होतो आणि डागही नाहिसे होतात. ३) गाजर आणि मधदोन गाजर किसून त्यात मध मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिट लावा, त्यानंतर धुवा. यामुळे चेहऱ्यावरील जास्तीचे आॅइल निघून पिंपल्सपासून सुटका होते शिवाय रंग गोरा होण्यास मदत होते. ४) दही आणि बटाटा१ बटाटा ठेचून त्यात एक वाटी दही मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटानंतर थंड पाण्याने धुवा. ही पेस्ट नैसर्गिक ब्लिचसारखे काम करते, त्यामुळे रंग गोरा होतो आणि स्किन मॉइश्चराइजपण होते. ५) ओटमिल आणि दूधअर्धा चमच ओटमिलमध्ये चार चमच दूध आणि थोडे पाणी मिक्स करुन ठेवा. थोड्या वेळाने चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी धुवा. यामुळे स्किन मॉइश्चराइज होते शिवाय पिंपल्स होत नाही आणि रंग गोरा होतो. ६) टमाटाएक टमाटा ठेचून चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. १० मिनिटानंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे पिंपल्सपासून बचाव होतो शिवाय एक्स्ट्रा आॅइल आणि मृतपेशी निघून जातात. ७) केळं आणि मधएक केळं, पाव चमच दही आणि दोन चमच मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा. २० मिनिटानंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे स्किन मॉइश्चराइज होते शिवाय स्किनमध्ये ग्लो येतो आणि यंग लुकदेखील मिळतो. ८) दही२ चमच ताज्या दहीला चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटानंतर धुवा. यामुळे स्किन रिव्हायटलाइज होते आणि रंग साफ होऊन यंग लुक मिळतो.९) मसूर दाळ आणि दूध५ चमच भिजवलेल्या मसूर दाळीच्या पेस्टमध्ये ५ चमच कच्चे दूध मिक्स करा. २० मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावून त्यानंतर धुवा. यामुळे स्किन टाइट होते, टॅनिंग दूर होते शिवाय सुरकूत्या नाहिस्या होतात. १०) बेसन आणि अंडेएक चमच बेसनमध्ये अंड्याचा पांढरा भाग मिक्स करुन त्यात लिंबूचे काही थेंब मिक्स करून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटानंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे रंग साफ होतो, स्किन मॉइश्चराइज होते शिवाय नको असलेले केस नाहिसे होतात.