उन्हाळ्यामध्ये त्वचेप्रमाणेच केसांनाही एक्स्ट्रा केअरची गरज असते. तुमचे केस कर्ली, वेवी, स्ट्रट कसेही असोत, उन्हाचा आणि उकाड्याचा यांच्यावर परिणाम होतोच. हिटमुळे केस डल, ड्राय आणि डॅमेज होतात. तसेच जास्त वेळ एसीमध्ये राहिल्याने केसांचं मॉयश्चर कमी होतं. उन्हाचा परिणाम केसांवर होऊ नये यासाठी बाजरातील अनेक प्रोडक्ट्सचा वापर करण्यात येतो. पण त्यामुळे काहीच फायदा होत नाही. त्याउलट केसांना अनेक साइड इफेक्ट्सचा सामना करावा लागतो. अशातच केसांचे आरोग्य राखण्यासाठी काही घरगुती उपायांचा आधार घेतला तर केसांचं आरोग्य राखण्यासाठी मदत होते.
आपण अनेक उपाय करत असतो. त्यापैकीच एक म्हणजे, स्वयंपाक घरात आढळून येणारं आलं केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. आतापर्यंत आल्याच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत आपण अनेकदा ऐकलं आहे. परंतु, तुम्ही कधी केसांसाठी असलेल्या आल्याच्या फायद्यांबाबत ऐकलं आहे का? आलं केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. केसांची वाढ होण्यासोबतच केस हेल्दी करण्यासाठीही मदद करतात.
केसांची वाढ होते
आल्यामध्ये असलेली पोषक तत्व स्काल्पमधील ब्लड फ्लो सुधारण्यासाठी मदत करतात. यामुळे हेअर फॉलिकल्सवर परिणाम होतो आणि केसांची वाढही होते.
केस गळण्यापासून रोखतं आलं
आल्यामध्ये फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे जर आल्याचा वापर स्काल्पसाठी केला तर केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. तसेच केसांचा पोत सुधारतो.
कोंड्यापासून सुटका
कोंडा एक अशी समस्या आहे, ज्यामुळे केसांवर वाईट परिणाम होतो आणि केस गळण्याचं प्रमाण वाढतं. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी आलं मदत करतं. यामध्ये असलेले अॅन्टीसेप्टिक गुणधर्म स्काल्प हेल्दी ठेवतात आणि याच्याशी निगडीत समस्या दूर ठेवतात.
केसांची मुळं मजबुत होतात
आल्याचा वापर केल्याने केस मुळांपासून मजबुत होतात. यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते. त्याचबरोबर केसांची ग्रोथ वाढते आणि हेअर क्वालिटीमध्ये सुधारणा होतात. आल्यामुळे केसांची शाइनही वाढते.
असा करा वापर...
एक टेबलस्पून बारिक केलेलं आलं घ्या आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून खोबऱ्याचं तेल एकत्र करा हे केसांच्या मुळांना लावा आणि मसाज करा. एका तासाने हलक्या गरम पाण्याने केस धुवून टाका.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.