Beauty : दाढी मऊ ठेवण्यासाठी खास टिप्स !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 12:08 PM
आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपली दाढी मऊ होण्यास मदत होईल. दाढी मऊ बनवण्यासाठी तुम्हाला दररोज या गोष्टी कराव्या लागतील -
बॉलिवूड किंवा मराठीच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये अभिनेत्यांची सध्या फूल दाढी दिसत आहे. विशेष म्हणजे चित्रपटातच नव्हे तर बदलती फॅशन म्हणून हे स्टार आपल्या व्यक्तिगत लाइफमध्ये फूल दाढी ठेवत आहेत. त्यांचेच अनुकरण करून बहुतांश तरुणांमध्ये फूल दाढीची क्रेझ वाढताना दिसत आहे. कॉलेज लाइफपासून व्यावसायिक क्षेत्रातील बरेच तरुण फूल दाढी ठेवत आहेत. मात्र दाढी ठेवल्यानंतर व्यवस्थित काळजी न घेतल्यास दाढी रखरखीत होते. त्यामुळे नकोशी वाटू लागते. जर आपल्याही चेहऱ्यावर सतत बोचणारी दाढी असेल तर मात्र तिला मऊ बनवायची असेल तर आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपली दाढी मऊ होण्यास मदत होईल. दाढी मऊ बनवण्यासाठी तुम्हाला दररोज या गोष्टी कराव्या लागतील -* शॅम्पू जशी तुम्ही आपल्या केसांची काळजी घेता तशीच आपल्या दाढीवरच्या केसांची काळजी घ्या. दाढीला आठवड्यातून दोनदा तरी शॅम्पू करा. यामुळे केस मऊ व चमकदार होण्यास मदत होईल. * क्लीन शेव्ह शेविंग करण्याचेही काही नियम असतात. बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने शेविंग केल्याने दाढी रखरखीत होते. यासाठी दर आठवड्यातून एकदा चांगल्या क्रीम, रेझरने क्लीन शेव्ह करा. असे केल्याने दाढीवरील कोरडे केस निघून जातील. शेविंग करताना चांगल्या दर्जाचे रेझर वापरा. * ट्रिम दाढी मऊ करण्यासाठी ट्रिमचाही उपयोग होऊ शकतो. दाढीतील कडक केस ट्रीम केल्याने इतरही केस मऊ होतात. नियमित ट्रिमिंगमुळे दाढीचा पोत सुधारेल. * कंडीशनर डोक्याचे केस मऊ होण्यासाठी आपण कंडीशनरचा वापर करतो. त्याचप्रमाणे दाढीलाही कंडीशनर लावल्यास केसांमध्ये मऊपणा येतो. * फेस वॉश बाह्य वातावरणाचा परिणाम होऊन तसेच धूळ, माती व घाण यामुळे दाढी रखरखीत होते. आपण फे्रश होण्यासाठी फेसवॉशने चेहरा स्वच्छ करतो. त्याच प्रमाणे फेसवॉशने चेहरा धुताना दाढीसुद्धा फेसवॉशने धुवा. यामुळे दाढीत साचलेली धूळ, माती व घाण निघून जाईल.