जेवल्यानंतर बडीशोपचं सेवन माऊथ फ्रेशनरप्रमाणे केलं जातं. स्वयंपाकघरात एखाद्या मसाल्याप्रमाणे बडीशोप असतेच. चवीला बडीशोप उत्तम असते. त्याप्रमाणेच केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी बडीशोपेचा वापर केला जातो. बडीशोपेत एंटीऑक्सिडेंट आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात. त्यामुळे केसांशी जोडलेल्या समस्या दूर होण्यासाठी बडिशोपेचं तेल फायदेशीर ठरतं. कारण बदलत्या जीवनशैलीत अनेक कारणांमुळे केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. नेहमी स्पा आणि महागड्या ट्रिटमेंट्स करूनही केस गळणं थांबत नाही.नेहमी पैसै घालवण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी कमी खर्चात या उपायाचा वापर कराल तर फरक दिसून येईल.
असं करा तयार
बडीशोपचं तेल तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एक कप नारळाचं तेलं घ्या. त्यात दोन चमचे बडीशोप घाला. हे तेल चांगलं उकळू द्या. उकळून झाल्यानंतर गॅस बंद करा. तेल थंड करत ठेवा. तेल थंड झाल्यानंतर एका डब्यात घालून ठेवा. हे तेल तुम्हाला दीर्घकाळ वापरात येऊ शकतं.
चांगल्या केसांसाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते. पण जास्त प्रमाणात प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा वापर केल्यानं स्काल्पमधून बाहेर येत असलेलं नैसर्गीक तेल कमी होऊ शकतं. परिणामी त्वचा कोरडी पडते. बडीशोपेच्या तेलात एंटीऑक्सिडेट्स असतात. त्यामुळे केसांना पोषण मिळून केस मऊ आणि मुलायम राहतात.
फायदे
केसांची वाढ होण्यासाठी हे तेल फायदेशीर ठरतं. फ्री रेडिक्लसमुळे केसांच्या मुळांना नुकसान पोहोचतं. त्यामुळे केसांची वाढ खुंटते. केस पातळ होतात. या फ्री रेडिक्लसशी लढण्याासाठी तुमच्या शरीरात एंटीऑक्सिडेंट्सची आवश्यकता असते. बडिशेपेत एसिड, आयर्न, कॉपर आणि फोलेट असते. त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.
केस गळण्याची समस्या कमी होऊन केस मजबूत राहतात. लांब काळ्याभोर केसांसाठी स्काल्प स्काल्प नेहमी स्वच्छ असणं गरजेचं असतं. या तेलामुळे केसांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होण्यापासून रोखता येऊ शकतं. तसंच केसांना पोषण मिळतं.
हे पण वाचा-
काळजी वाढली! व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे झपाट्यानं वाढतोय कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा दावा
कोरोनावर मात करणारी लस कधी येणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं उत्तर; म्हणाले....