आयब्रोज सुंदर, दाट आणि काळेभोर असतील तर चेहरा प्रभावी आणि आकर्षक दिसतो. अनेकजण आपले आयब्रोज सेट करण्यासाठी प्रत्येक महिन्याला पार्लरला जातात. आयब्रोजचा आकार बदलण्याठी किंवा जाड, मोठे ठेवण्यासाठी थ्रेडिंग करावं लागतं. यामुळे खूप वेदना होतात. मायक्रोब्लॅडिंग ट्रिटमेंट आयब्रो सेट करण्याची एक टेक्निक आहे. याद्वारे तुम्ही आपल्या मनाप्रमाणे आय ब्रोजचे केस ठेवू शकता. या प्रकाराचे वेगळेपणं म्हणजे थ्रेडींग करताना वेदना कमी होतात. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
माइक्रोब्लेडिंग म्हणजे काय?
मायक्रोब्लेडिंग एक आयब्रोजना आकार देण्याची पद्धत आहे. यात एका पेनाप्रमाणे दिसत असलेल्या उपकरणाचा वापर केला जातो. यात लहान लहान सुयांप्रमाणे ब्लेड लावलेले असते. आयब्रोच्या एपिडर्मिस लेअरला चांगला शेप देण्यासाठी हे उपकरण फायदेशीर ठरतं. मायक्रोब्लेडिंग टिकणं तुमची लाईफस्टाईल आणि त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असतं.
१ ते ३ वर्षांपर्यंत पुन्हा आयब्रोज करण्याची आवश्यकता भासत नाही. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर १ वर्षानंतर आयब्रो सेट करण्याची गरज भासू शकते. नॉर्मल स्किन टाईप असलेल्या महिलाचे आयब्रो साधारणपणे १८ महिन्यांपर्यंत व्यवस्थित राहू शकतात. त्यासाठी प्रखर सुर्यप्रकाशापासून त्वचेचा बचाव करायला हवा. मायक्रोब्लेडिंग एक सुरक्षित आणि सोपी ट्रिटमेंट आहेत. अत्यंत कमी वेळात तुम्ही मायक्रोब्लेडिंग करू शकता. सगळ्यात आधी आयब्रोजची हलक्या हातानं मालिश केली जाते. त्यानंतर ट्रिटमेंट सुरू होते. यादरम्यान तुमच्या कानावर ब्लेडचा आवाज नक्की कानावर पडेल पण जास्त वेदना जाणवणार नाहीत.
ही काळजी नक्की घ्या
मायक्रोब्लेडिंग केल्यानंतर एक आठवडा उन्हाळाच्या संपर्कात येऊ नका.
ही ट्रिटमेंट घेण्याच्या एक आठवडा आधी थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करू नका.
जवळपास एक महिना आधीपासून रेटिनॉल आणि व्हिटामीन ए युक्त उत्पादनांचा वापर करू नका. फेशियल करू नका.
मायक्रोब्लेंडिंग नंतर व्यायाम करू नका.
ही ट्रीटमेंट केल्यानंतर चोविस तासांच्या आत एस्पिरिन किंवा आयब्रुप्रोफेनचं सेवन करू नका.
मायक्रोब्लेडिंग करण्याआधी आयब्रोंना रंग लावू नका.
तसंच ही ट्रीटमेंट केल्यानंतर धुम्रपान किंवा अल्कोहोलचं सेवन करू नका.
हे पण वाचा-
काळजी वाढली! व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे झपाट्यानं वाढतोय कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा दावा
कोरोनावर मात करणारी लस कधी येणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं उत्तर; म्हणाले....