Beauty Tips : केसांच्या सौंदर्यासाठी असा करा मसाज !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2017 8:46 AM
मसाज चुकीच्या पद्धतीने झाल्यास फायद्या ऐवजी नुकसानच होते. यासाठी मसाज करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.
केसांचे आरोग्य आपण केसांची काळजी कशी घेतो यावर अवलंबुन असते. बºयाचदा आपण केस मुलायम राहण्यासाठी केसांचा मसाज करतो, मात्र हा मसाज चुकीच्या पद्धतीने झाल्यास फायद्या ऐवजी नुकसानच होते. यासाठी मसाज करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. * मसाज करण्यासाठी काय साहित्य घ्याल?खोबरेल तेल किंवा विटँमिन 'इ'युक्त तेल, कॉटन(कापूस), गरम पाणी, टॉवेल, शँम्पू इत्यादी. * कसा कराल केसांचा मसाज? प्रथम खोबरेल तेल थोडे कोमट करुन घ्यावे. केसाचे दोन भाग करुन कापसाच्या साहाय्याने सगळ्या केसांच्या मुळाशी तेल चांगल्या प्रकारे लावावे. मसाज सुमारे १५ मिनिटे गोलाकार करावा. १५ मिनिटे व्यवस्थीत मसाज झाल्यावर गरम पाण्यात टॉवेल भिजवून केसांना गुंडाळून थोडा वेळ वाफ घ्यावी. या क्रियेला स्टीम असे म्हणतात. शिवाय एका कानापासून दुसºया कानापर्यंत क्रॉस मसाज करावा. तसेच थोडे-थोडे केस घेऊन संपूर्ण केसांचा गरम तेलाने मसाज करु शकता. मानेपासून खांद्यापर्यंत खालच्या दिशेने मसाज केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. अधून-मधून डोक्याचे पॉईट दाबावे या क्रियेला पंचिंग असे म्हणतात. मसाज झाल्यानंतर केस शँम्पूने स्वच्छ धुवावेत. Also Read : ...म्हणून लावावे केसांना दही !