Beauty Tips : पुरुषांनो, चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी कोरफडचा असा करा वापर !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2017 1:11 PM
विशेष म्हणजे स्त्रियांच्या त्वचेसाठी कोरफड जितकी उपयोगी आहे, तितकीच ती पुरुषांसाठीही लाभदायक आहे.
-Ravindra Moreकोरफडचे फायदे आपणास माहित आहेतच. बहुतांश महिला आपले सौंदर्य खुलविण्यासाठी कोरफडचा वापर करतात. त्वचेच्या प्रत्येक समस्यांवर कोरफड रामबाण उपाय आहे. विशेष म्हणजे स्त्रियांच्या त्वचेसाठी कोरफड जितकी उपयोगी आहे, तितकीच ती पुरुषांसाठीही लाभदायक आहे. कोरफड चेहºयावरील मृत पेशी काढून त्वचेला स्वच्छ करण्याचे काम करते. कोरफडीचा उपयोग करून पुरूषही आपली त्वचा मुलायम व साफ बनवू शकतात. * अनेक पुरुषांची त्वचा शेव्ह केल्यानंतरही ड्राय होते. अशा वेळी चमकदार त्वचा मिळवण्यासाठी एक चमचा अॅलोवेरा जेल, एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध एकत्र मिसळून चेहऱ्यावर लावा. असे रोज केल्यास त्वचा मुलायम व टवटवीत राहील. * ज्यांची त्वचा सामान्य आहे त्यांना जास्त काही करण्याची गरज नाही. एक चमचा गुलाबजल, एक चमचा दही, एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर व एक चमचा अॅलोवेरा जेल मिसळून चेहऱ्यावर लावा. आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावल्याने तुमची त्वचा चमकायला लागेल. * तेलकट त्वचा असेल तर एक चमचा काकडीचा रस, एक चमचा गुलाबजल, एक चमचा अॅलोवेरा जेल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट १५ मिनिटे त्वचेवर लावून ठेवा. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल.