(Image Credit : Enrich Salon)
पावसाळ्यामध्ये गरमा-गरम चहा किंवा कॉफीचा कप हातात असावा, असं आपल्यापैकी सर्वांनाच वाटत असतं. कारण पावसाळ्यामध्ये वातावरणातील गारवा वाढतो. सगळीकडे हिरवळ वाढते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अगदी हैराण करणाऱ्या सूर्याच्या प्रखर किरणांपासून सुटका होते. पण आपल्या स्किनबाबत या गोष्टी लागू होत नाहीत. कारण पावसाळा सुरू झाला की, त्वचेशी निगडीत समस्यांमध्ये वाढ होते. यामध्ये ओपन पोर्स, डल स्किन, पिंपल्स आणिऑयली स्किन यांसारख्या समस्यांचा समावेश असतो. याव्यतिरिक्त या वातावरणात केसांमध्येही ओलावा तसाच राहतो. परिणामी केस चिकट होतात. यामुळे केस गळण्याचे प्रमाणही वाढते. अशामध्ये त्वचा आणि केसांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. या सर्व समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी काही गोष्टी आधीपासूनच लक्षात घेणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे स्किन आणि केसांचा वेगवेगळ्या समस्यांपासून बचाव होतो.
(Image Credit : Hello Magazine)
चेहरा करा डिप क्लिंज
जर तुम्ही पावसामध्ये भिजून आला असाल तर, तुमचा चेहरा आणि पाय व्यवस्थित स्वच्छ करा. तसेच कोरडे करून घ्या. चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेस वॉशचा वापर करा. पण तो फेसवॉश माइल्ड असेल, याची काळजी घ्या. त्यामुळे फेस वॉश स्किन क्लीन करण्यासाठी मदत करेल. तसेच स्किनवरील नॅचरल ऑइल तसचं राहण्यासही मदत होईल.
स्किन एक्सफॉलिएट करणं आवश्यक
पावसाळ्यामध्ये चेहरा स्वच्छ करणं अत्यंत आवश्यक असतं. कारण या वातावरणात बॅक्टेरियांमध्ये वाढ होते. तसेच स्किनचे पोर्स बंद होण्याची समस्याही वाढते. आठवड्यातून एकदा चेहरा एक्सफॉलिएट केल्याने स्किनवरील डेड स्किन सेल्स दूर होतात आणि त्याचबरोबर नवीन सेल्सचा विकास होण्यास मदत होते. त्याचबरोबर चेहऱ्याचा रंग उजळण्यासही मदत होते.
हॉट ऑइल मसाज
ओले केल फार नाजूक असतात. थोडेसे ओढले गेल्यानंतरही केस लगेच तुटतात. अशातच पावसाळ्यामध्ये तुमचे केस टॉवेलने अलगत कोरडे करा. ओले केस अजिबात ओढू नका आणि विंचरणंदेखील टाळा. या वातावरणात केसांना आतून पोषण देणं आणि हेअर फॉलिकल्स मजबूत करणं आवश्यक असतं. यासाठी स्काल्प आणि केसांची कोमट तेलाने मालिश करणं फायदेशीर ठरतं.
पायांची काळजी घ्या
पावसाळ्यात पाणी आणि चिखल असलेल्या रस्त्यांवरून चालताना पाय फार घाण होतात. एवढचं नाहीतर अनेक बॅक्टेरिया पायांवर जमा होतात. तसेच ओलाव्यामुळे पायांना फंगल इन्फेक्शन आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. अशातच पायांची काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळे जेव्हाही घरातून बाहेर पडाल तेव्हा घरी परतल्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ करून कोरडे करा. दररोज पायांना मॉयश्चरायझर लावा.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.