आपला अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजे मान. पण आपण मानेची काळजी कधी घेतच नाही. शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन, ऊन, धूळ आणि सर्दी यांमुळे आपल्या मानेची त्वचा काळवंडते. हिवाळ्याच थंडीमुळे त्वचा कोरडी होते. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या क्रिम्सचा वापर करतो. पण दररोज आंघोळ करताना आपण मान स्वच्छ करत नाही. त्यामुळे थंडीमध्ये मानेजवळची त्वचा काळवंडते. जाणून घेऊया मानेची त्वचा स्वच्छ करण्यासाठी काही उपायांबाबत...
कोरफड
कोरफडीचे जेल नियमितपणे मानेवर लावल्याने मानेजवळच्या काळवंडलेल्या त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. तसेच त्वचा मुलायम होते.
वाफ घ्या
मानेची त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी एक टॉवेल गरम पाण्यामध्ये बुडवून त्यातील पाणी काढून घ्या. त्यानंतर तो टॉवेल मानेवर ठेवा. 10 ते 15 मिनिटांनंतर टॉवेलने मान स्वच्छ करून घ्या. त्यामुळे मानेवरील त्वचेची बंद झालेली रोम छिद्र खुलतात आणि मानेचा रंगही उजळतो.
बेकिंग सोडा
मानेच्या त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा पाण्यामध्ये एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. यामध्ये एक चमचा मीठही वापरू शकता. तुमचं स्क्रब तयार आहे. मानेवर स्क्रब प्रमाणे लावल्यामुळे मानेवरील डेड स्किन सेल्स निघून जातात. तसेच काळपटपणाही दूर होतो.
नॅचरल ब्लीच
मानेचा काळपटपणा दूर करण्यासाठी काही नॅचरल वस्तूंचा वापर तुम्ही करू शकता. यामध्ये कच्चा बटाटा, चंदनाची पावडर, मुलतानी माती, लिंबू यांसारख्या गोष्टींचा वापर तुम्ही करू शकता. कच्चा बटाट्याचा तुकडा मानेवर चोळल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. याव्यतिरिक्त चंदन पाउडर, मुलतानी मातीची पेस्ट तयार करून त्वचेवर लावा. मानेचा रंग उजळण्यास मदत होईल.