Beauty Tips : सुंदर त्वचेसाठी सेलिब्रिटींच्या डायटमध्ये असतात ‘हे’ सहा पदार्थ !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2017 7:12 AM
सेलिब्रिटींना आपल्या त्वचेचे सौंदर्य टिकविणे खूप आवश्यक असते. त्यासाठी त्या खूप मेहनतसोबतच डायटचीही विशेष काळजी घेतात.
-Ravindra Moreसेलिब्रिटींना आपल्या त्वचेचे सौंदर्य टिकविणे खूप आवश्यक असते. त्यासाठी त्या खूप मेहनतसोबतच डायटचीही विशेष काळजी घेतात. त्यामुळे त्यांचे जरी वय वाढले तरी त्यांच्या त्वचेचे सौंदर्य टिकून राहते. एका अभ्यासानुसार डायटमध्ये काही ठराविक पदार्थांचा समावेश नियमित केल्यास त्वचेचे सौंदर्य टिकून राहते. जाणून घेऊया त्या पदार्थांबाबत...सुंदर त्वचेसाठी महागडे सौंदर्य प्रसाधने किंवा परफेक्ट स्किनकेअर रुटीन फॉलो करणे पुरेसे नसते. आपला डायटदेखील महत्त्वपूर्ण आहे. जर आपणासही सुंदर आणि हेल्दी त्वचा हवी असल्यास आपल्या डायटमध्ये या सहा पदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे. * लिंबूशरीराला डिटॉक्स (विषमुक्त) करण्याचा हा प्रभावी उपाय आहे. यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यात अर्ध्या लिंबूचा रस सेवन करावा. यामुळे पचनसंस्था उत्तम राहते, शिवाय लिंंबूचा रस कोशिंबीरवरदेखील स्प्रे करुन सेवन करू शकता. * सफरचंद यात सॉल्यूब्ल आणि इनसॉल्यूबल फायबर असल्याने यामुळे आपल्या शरीरातून टॉक्सिन्स आणि घाण बाहेर टाकली जाते ज्यामुळे आपली त्वचा हेल्दी होते. एवढेच नव्हे तर यातील विटॅमिन्स, मिनरल्स आणि फ्लॉवोनाइड्स स्किनला हेल्दी बनवितात. * पालक पालकातील गुणधर्मामुळे स्किनला फायदा तर होतो शिवाय डोळ्यांचे आरोग्यही सुदृढ राहते. यातील विटॅमिन ए आणि सी स्किनला हेल्दी ठेवण्यास मदत करतात. सोबतच कॉलेजन प्रोडक्शनला मेंटेन करु न आपणास दिर्घ काळापर्यंत तरुण ठेवते. * बादामयातील विटॅमिन ए आणि अॅन्टि-आॅक्सिडेंट्समुळे स्किन डिटॉक्स तर होते शिवाय आपल्या वाढत्या वयाची लक्षणेही लपविले जातात. तसेच स्किन स्मूद होऊन स्किनला अतिनिल किरणांपासूनही बचाव होतो. * बीट यातील विटॅमिन बी३, बी६, सी आणि बिटा-कॅरोटिनमुळे आपल्या शरीरातील डिटॉक्सीफिकेशन प्रोसेस उत्कृष्ट होते. सोबतच लिव्हर आणि गॉलब्लेडरच्या योग्य पद्धतीने फंक्शन करण्यास मदत होते ज्यामुळे आपल्या शरीरातून टॉक्सिन्स पूर्णत: बाहेर निघून जातात. शिवाय यातील फायबरमुळे पचनसंस्था सुदृढ होण्यास मदत होते. * गोड बटाटेगोड बटाटा या स्टार्च फूडमध्ये बिटा-कॅरेटिन भरपूर असून त्यामुळे स्किनमधून टॉक्सिन्स बाहेर निघुन स्किन ग्लो होण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर यातील विटॅमिन ए आणि सी फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो. यातील बायोटिन केस आणि नखांच्या वाढीस मदत करतात. Aslo Read : Beauty Tips : पुरुषांनो, चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी कोरफडचा असा करा वापर ! : BEAUTY TIPS : सतेज त्वचेसाठी करा घरगुती उपाय !