शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beauty Tips : ​त्वचेच्या प्रत्येक समस्यांवर 'हे' आहेत परफेक्ट घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2017 7:34 AM

आपल्या त्वचेवर पिंपल्स आहेत, त्वचा तेलकट आहे, चेहऱ्यावर डाग आहेत..आदी समस्यांसाठी हे आहेत परफेक्ट उपाय !

-रवींद्र मोरे घरगुती उपाय खूपच प्रभावी आणि सुरक्षित असतात, यात तिळमात्र शंका नाही. या उपायांचा परिणाम निश्चितच उशिराने लागतो, मात्र यामुळे निराशा कधीही पदरी पडत नाही. जर या घरगुती उपायांचा वापर योग्य प्रकारे आणि नियमित केल्यास कोणत्याही ब्यूटी प्रोडक्ट किंवा ट्रीटमेंटची गरज भासणार नाही. चला जाणून घेऊया, त्या घरगुती उपायांच्या बाबतीत ज्याद्वारे त्वचेच्या बऱ्याच समस्या दूर होतील आणि आपल्याला मिळेल सुंदर त्वचा.  * चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बरेच घरगुती उपाय आहेत. त्यातील एक प्रभावी उपाय म्हणजे टोमॅटो आणि गुलाबपाण्याची पेस्ट. यासाठी अर्ध्या टोमॅटोला ठेचून त्यात गुलाबपाणी मिक्स करा. ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर लावा. १० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा. काही दिवस हा प्रयोग करावा. आपण टोमॅटो ऐवजी काकडीचाही वापर करु शकता. ज्यांची सेंसिटिव्ह स्किन आहे त्यांनी मात्र एकदा ही पेस्ट वापरण्या अगोदर एक पॅच लावून टेस्ट करावी.  * ग्लोविंग स्किनसाठी आपण दोन सोप्या फेस पॅकचा वापर करु शकता. पहिला म्हणजे दररोज दोन चमच दही मध्ये एक चमच मध मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. १५ मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. दुसरा म्हणजे संत्रीच्या टरफल्यांना कोरडे करून त्याचे पावडर तयार करावे. एक चमच पावडरमध्ये एक चमच मध, चिमूटभर हळद पावडर, दोन-तीन लिंबूच्या रसाचे थेंब आणि पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. कोरडी झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा.  * आपण तेलकट त्वचेने त्रस्त असाल तर एक चमच मुलतानी माती, एक चमच गुलाबपाणी आणि अर्धा चमच केसर मिक्स करून चेहऱ्यावर लावा. कोरडी झाल्यानंतर स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्यास तेलकट त्वचेपासून सुटका मिळेल शिवाय त्वचेचा ग्लोदेखील वाढले.* आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर अगोदर काही निंबाच्या पानांचा चांगले स्वच्छ धुवा. त्यानंतर अर्धी काकडी घेऊन दोन्हीही एकजीव करा आणि ही पेस्ट पिंपल्सवर लावा. कोरडी झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. काही दिवसांसाठी हा उपाय दररोज केल्यास पिंपल्स दूर तर होतील शिवाय आपली स्किन मॉइश्चराइज्डदेखील होईल.  * आपली स्किन सॉफ्ट असावी, असे कोणाला वाटणार नाही. यासाठी आपणास जास्त मेहनत घेण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी एक चमच अ‍ॅलोवेरा जेल, एक चमच मध आणि लिंबूच्या रसाचे काही थेंब एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटानंतर स्वच्छ धुवा. आठवड्यातून दर दोन दिवसांनी असे करा. शिवाय हळद, चंदन पावडर आणि गुलाबपाणीने बनलेल्या पॅकचाही आपण सॉफ्ट स्किनसाठी वापर करु शकता.  * ग्लोविंग त्वचेसाठी एक सोपा पॅक आपण वापरू शकता. यासाठी दोन चमच बेसन, अर्धा चमच हळद पावडर आणि तीन चमच दूध किंवा गुलाबपाणी एकत्र करुन चेहरा आणि मानेवर लावावे. आठवड्यातून दोनदा या पेस्टचा वापर करावा. यामुळे त्वचा ग्लो होण्यास मदत होते.   Also Read : ​Beauty Tips : ​पुरुषांनो, चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी कोरफडचा असा करा वापर !                   : ​Beauty Tips : ​त्वचेच्या आरोग्यासाठी ‘गुलाब तेल’ गुणकारी !